शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

गत आर्थिक वर्षांत ४१ हजार नागरिकांनी केले स्थलांतर!

By admin | Updated: September 2, 2016 01:04 IST

रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी कारणांसाठी मोठय़ाप्रमाणात स्थलांतर होते.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. १: राज्यात रोजगार, शिक्षण तथा व्यवसायासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत असून २0१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल ४१ हजार ७१६ नागरिकांनी विविध कारणांसाठी इतर जिल्हे, राज्य व देश पातळीवर स्थलांतर केले असल्याचे राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार निदर्शनास आले. स्थलांतराला रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी मुख्य कारणे आहेत. जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी बर्‍याच वेळा मनुष्यावर स्थलांतर करण्याची वेळ येते. यावेळी कामाच्या शोधात मनुष्य स्वत: किंवा कुटुंबासह इतर जिल्ह्यात, राज्यात व देशाबाहेर स्थलांतर करतो. बर्‍याच वेळा स्थलांतरित व्यक्ती स्थलांतर झालेल्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्याला राहतो. यात मजूर किंवा शासकीय नोकरदार वर्गाचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. तर यात विवाहित पुरुष-स्त्रियांची संख्या उल्लेखनीय आहे. भारतीय जनगणनेच्या आधारावर राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालन विभागाकडे याबाबत नोंदणी दरवर्षी अद्यावत केली जाते. यानुसार २0१५- १६ या आर्थिक वर्षात ४१ हजार ७१६ नागरिकांची स्थलांतरित म्हणून नोंदणी करण्यात आली. यात ग्रामीण २२ हजार ४५0 तर शहरी १९ हजार २६५ नागरिकांचा समावेश आहे. तर यात पुरुष १६ हजार ७६४ असून स्थलांतरित झालेल्या स्त्रिायांची संख्या २४ हजार ९५२ एवढे आहे, हे विशेष.महिलाचे स्थलांतर जास्तभारतीय रुढीनुसार, विवाहानंतर मुलगी तिच्या पतीच्या घरी जाते किंवा रोजगाराच्या शोधात पतीसोबत पत्नी जाण्याचे कारणही आहे, याआधारे अहवालानुसार स्थलांतरीत महिलांची संख्या जास्त दर्शविण्यात आली आहे. यात विवाह कारणातून ग्रामीण भागात १0 हजार ६९१ तर नागरी भागातून ४ हजार १७७ अशा एकूण १४ हजार ७५४ स्त्रियांनी वर्षभरात स्थलांतर केल्याची नोंदणी आहे. या तुलनेत वर्षभरात विवाहकारणातून स्थलांतर झालेल्या पुरुषांचा आकडा केवळ ११४ एवढा आहे.स्थलांतराच्या कारणांचा आलेखकारण              स्त्री - पुरुषरोजगार            ६९0५व्यवसाय             १९३शिक्षण                ६0४विवाह              १४८६८जन्मानंतर         ५१0९कुटुंबासह            ७१८८इतर                  ६८४८