शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:40 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे. 

ठळक मुद्देजिल्हय़ात १ लाख ३६ हजार शेतकर्‍यांनी भरले ‘ऑनलाइन’ अर्जअर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे होणार चावडी वाचन!२ लाख ४४ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांंची नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याचे काम गत २४ जुलैपासून जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर सुरू आहे. २१ सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ात १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंंंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कर्जमाफीचे अर्ज भरण्यास शासनाकडून सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार, २२ सप्टेंबर आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे होणार चावडी वाचन!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्यात येणार आहेत. या शेतकरी याद्यांचे गावनिहाय चावडी वाचन करण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.

२ लाख ४४ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांंंची नोंदणी!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २१ सप्टेंबर या कालावधीत २ लाख ४४ हजार ८३0 शेतकर्‍यांच्या अर्जांंंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३६ हजार ४२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.