शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Video - सर्वोपचारमधील रुग्णांच्या जेवणात निघाल्या अळ्या, किडे

By सचिन राऊत | Updated: December 29, 2023 18:40 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३१ मध्ये शुक्रवारी देण्यात आलेल्या जेवणात चक्क किडे व ...

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३१ मध्ये शुक्रवारी देण्यात आलेल्या जेवणात चक्क किडे व अळ्या निघाल्याचा धक्कादायक तसेच किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणातील अळ्या व किडे रुग्णाच्या ताटात निघाल्यानंतर त्यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र येथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे ताट व ताटातील अन्न फेकून देत रुग्णास रुग्णालयाच्या बाहेर काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या गलथान कारभाराने कळस गाठल्याचे वास्तव आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आलेले आहे. डॉक्टरांच्या तसेच प्रशिक्षणार्थ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचेही आरोप झाले आहेत. वाढती रुग्णसंख्या व त्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ असल्याच्या नेहमीच ओरड असल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची प्रशासनाची बाजू आहे; मात्र अन्नपदार्थांमध्ये चक्क किडे आणि अळ्या निघाल्यानंतर प्रशासनाने यावर उपाययोजना न करता हा प्रकार लक्षात आणून देणाऱ्या रुग्णासच धाकदपट करीत बाहेर काढून दिले. रुग्णाच्या ताटातील अन्नपदार्थांमध्ये किडे व अळ्या वळवळ करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसा व्हिडिओही सर्वत्र व्हायरल झालेला आहे. मात्र त्यानंतरही प्रशासनाने अद्याप संबंधित दोशींवर कारवाई न केल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

संत गजानन महाराज संस्थानशी करावा करारशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सरोपचार रुग्णालय येथील रुग्णांच्या जेवणासाठी श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान यांच्याशी करार करावा अशी मागणीही मनसेचे राकेश काळे यांनी यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांच्याकडे केल्याची माहिती आहे.

या रुग्णाच्या जेवणात निघाल्या अळ्या व किडेउगवा येथील रहिवासी उकर्डा बळीराम मेहरे या रुग्णास वार्ड क्रमांक ३१ मध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना शुक्रवारी दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान जेवणाचे ताट देण्यात आले. याच ताटात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये किडे व अळ्या असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांना सांगितला तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताटातील अन्न फेकून दिले व रुग्णासही बाहेर काढून दिलयाचा आरोप मेहरे यांनी केला आहे.

दोषींवर कारवाईसाठी मनसे आक्रमक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांच्या ताटात व जेवणात किडे आणि अळ्या निघाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश काळे यांनी तात्काळ दखल घेत दोशींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही राजेश काळे यांनी दिला. रुग्णांना जनावरापेक्षाही खालच्या दर्जाचे जेवण देणाऱ्या कंत्राटदारावरही कारवाई करण्याची मागणी राजेश काळे यांनी केली.

टॅग्स :Akolaअकोला