शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वॉरंटी कालावधीत बिघडला लॅपटॉप; ग्राहक मंचचा दुकानदारास दणका

By सचिन राऊत | Updated: March 22, 2024 19:45 IST

ग्राहक मंचाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, सदस्य सुहास आळशी, नीलिमा बेलोकार यांनी हा आदेश बजावला.

अकोला: शहरातील एका दुकानातून खरेदी केलेल्या लॅपटाॅपची एक वर्षाची वारंटी असतांना ताे सातव्या महीन्यातच बंद पडला असता दुकानदाराने ताे बदलूनही दिला नाही दुरुस्तही करून दिला नाही. त्यामूळे ग्राहकाने या विराेधात ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात धाव घेतली असता मंचाने दुकानदारास फटकारत ग्राहकास लॅपटाॅप देण्याचा आदेश दिला आहे.

एसटी कॉलनी परिसरातील रहिवासी रजनी नंदलाल सावळे व त्यांचे पती नंदलाल सावळे यांनी रणपिसे नगर येथील सिग्मा कॅम्पुटरमधून अशर कंपनीचा नवीन लॅपटॉप खरेदी केला होता. लॅपटॉपमध्ये कोणताही निर्मिती दोष असल्यास तो निशुल्क व आवश्यकतेनुसार पार्ट बदलून, दुरुस्त करून दिल्या जाईल असे एक वर्षाच्या वॉरंटी पिरियड मध्ये नमूद करण्यात आले होते. खरेदी केल्याच्या सात महिन्यात प्रस्तुत लॅपटॉप बंद पडला. नंदलाल सावळे यांनी या संदर्भात दुकानदारास माहिती दिली. मात्र दुकानदाराने लॅपटॉप वॉरंटीत असूनही दीड महिना चालढकल केली. यानंतर पुन्हा दुकानदारास लॅपटॉप संदर्भात विचारणा केली असता लॅपटॉप वॉरंटी पिरियडमध्ये नसल्याचे सांगितले. सावळे यांनी हा लॅपटॉप वारंटीत असल्याची बाब निदर्शनास आणल्यावर टेक्निशियनने हा लॅपटॉप दुरुस्त केला. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा लॅपटॉप बंद पडला.

सावळे यांनी या संदर्भात पुन्हा आपली तक्रार नोंदवली. टेक्निशियनने पुन्हा सावळे यांचा लॅपटॉप दुरुस्त केला मात्र पुन्हा ताेच प्राॅब्लेम झाल्याने तसेच वारंवार दुरुस्ती करूनही तो नादुरुस्त होत असल्याने लॅपटॉपमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सावळे यांच्या निदर्शनास आले. त्यामूळे सावळे यांनी दुकानदार व अशर कंपनीविरुद्ध ग्राहक मंचात क्षतीपूर्तीची तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाने कंपनी, दुकानदार व तक्रारदार सावळे यांचे म्हणणे ऐकून तक्रारदार सावळे यांनी घेतलेल्या लॅपटॉपऐवजी नवीन लॅपटॉप एक वर्षाच्या वॉरंटी समवेत देऊन तक्रारदाराला शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासापाेटी सात हजार रुपये व प्रकरण खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश बजावलेत. ग्राहक मंचाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, सदस्य सुहास आळशी, नीलिमा बेलोकार यांनी हा आदेश बजावला.

टॅग्स :Akolaअकोला