शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख उपसंचालकांनी पुन्हा दिले स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:49 IST

शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन गजराज मारवाडी याच्या नावे करण्यासाठी या विभागाच्या तत्कालीन कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. या कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यास विलंब करणार्‍या अकोला येथील भूमी अभिलेख कार्यालयाला भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी बुधवारी स्मरणपत्र दिले. मात्र, त्यानंतर अद्यापही या कार्यालयाकडून त्या कर्मचार्‍यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देभूखंड हडपल्याचे प्रकरण कार्यालयाची दिरंगाई कायम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन गजराज मारवाडी याच्या नावे करण्यासाठी या विभागाच्या तत्कालीन कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. या कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यास विलंब करणार्‍या अकोला येथील भूमी अभिलेख कार्यालयाला भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी बुधवारी स्मरणपत्र दिले. मात्र, त्यानंतर अद्यापही या कार्यालयाकडून त्या कर्मचार्‍यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला नसल्याची माहिती आहे.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांनी तत्कालीन अधिकार्‍यांना अंधारात ठेवत गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन भूखंड कागदोपत्री हडपला. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस व भूमी अभिलेख विभागात होताच हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. या प्रकरणात आता भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी दोन वेळा तोंडी व बुधवारी लेखी स्मरणपत्र देऊन निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.

एनआयसीचा अहवाल आज मिळणार!राष्ट्रीय सूचना विज्ञान कें्रदात ही ऑनलाइन नोंद केव्हा करण्यात आली, याची तपासणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने पत्र दिले होते. या केंद्रात ही तपासणी झाली असून, शुक्रवारी या तपासणीचा अहवाल भूमी अभिलेख विभागाला मिळणार असल्याची माहिती आहे. संगणकात तपासणीचे केवळ १0 मिनिटांचे काम असलेल्या या अहवालाला तब्बल एक महिन्याच्यावर कालावधी लागल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकाच परिसरात असलेल्या या दोन कार्यालयात अहवाल देण्यासाठी एवढा कालावधी का लागला, हा या दोन्ही विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय आहे.

‘ते’ तीन कर्मचारी कोण?भूखंडाची ऑनलाइन नोंद घेण्यासाठी तत्कालीन तीन कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. संगणकाचा पासवर्ड आणि कोडवर्ड याच कर्मचार्‍यांकडे होता. उपअधीक्षकांना अंधारात ठेवून परस्पर ही नोंद घेण्यात आली होती. ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली असून, भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांनाही ही नावे माहिती आहेत. मात्र, त्यानंतरही या तीन कर्मचार्‍यांची पाठराखण होत आहे.