शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:19 IST

वाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्ह्यातील ९७ किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ आॅगस्ट रोजी जारी झाले असून, संबंधित शेतकºयांना २१ आॅगस्टपर्यंत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत.

ठळक मुद्देअकोला-हैदराबाद राष्टÑीय महामार्ग२१ आॅगस्टपर्यंत स्वीकारले जाणार आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्ह्यातील ९७ किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ आॅगस्ट रोजी जारी झाले असून, संबंधित शेतकºयांना २१ आॅगस्टपर्यंत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत.अकोला ते हैदराबाद या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर रस्ता रूंदीकरण, चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी रस्त्यालगतची जमीन संपादन करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मेडशी गावापासून ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या राजगाव या दरम्यानच्या गावातील शेतकºयांची रस्त्यालगतची जमीन संपादीत केली जाणार आहे. सदर जमिनीच्या संदर्भात जमीन मालक किंवा जमिनीशी हितसंबंध असणाºया व्यक्तिला काही शंका किंवा आक्षेप असेल तर २१ आॅगस्टपर्यंत वाशिम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात हरकत किंवा आक्षेप नोंदविता येणार आहेत.तथापि, सर्व हरकती ऐकून घेतल्यानंतर आणि काही प्रकरणात चौकशी आवश्यक असल्यास सक्षम प्राधिकरणामार्फत चौकशी केली जाईल.चौकशीअंती हरकती स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा आदेश जारी करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास देण्यात आले आहेत. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला आदेश हा अंतिम राहणार आहे. हरकती व आक्षेपांचे निरासरण केल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या महामार्गालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे.अकोला-हैदराबाद राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित शेतकºयांना काही आक्षेप किंवा हरकती नोंदविता येणार आहेत. कुणाला काही आक्षेप असल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय वाशिम येथे लेखी स्वरुपात हरकती नोंदवाव्यात.- अभिषेक देशमुख, उपविभागीय अधिकारी, वाशिम.-