शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आकोट येथे तलाठय़ास दोन हजाराची लाच घेताना पकडले!

By admin | Updated: October 15, 2016 03:24 IST

शेतक-याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठयास रंगेहात पकडले.

आकोट, दि. १४- शेतामधील पोटखराबीचे क्षेत्रफळ दुरुस्त करून देण्याकरिता तक्रारदार शेतकर्‍याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी संदीप विठ्ठल ढोक यास अकोला अँन्टी करप्शन ब्यूरोने रंगेहात पकडले. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. तक्रारदार याने आपल्या शेतामध्ये पोटखराबी नाही व आधीच्या सात-बारामध्ये पोटखराबी दाखविली नाही. नंतर मात्र सेतूमधून सात-बारा काढला असता पोटखराबी दाखविण्यात आली. याबाबत तहसीलदार आकोट यांना सात-बारावरील क्षेत्र दुरुस्ती करून पोटखराबी काढून टाकण्याबाबत विनंती अर्ज दिला होता; परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार असल्याचे तहसीलदार यांना ७ ते ८ दिवस आधी कळविले असता, कुटासा येथील तलाठी संदीप ढोक यांनी २0 दिवसांत कार्यवाही करतो, असे लेखी दिले; परंतु कार्यवाही केली नाही. उलट सात-बारामधील दुरुस्ती करून पोटखराबीचे क्षेत्रफळ काढून टाकण्याकरिता पाच हजर रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारकर्त्याने अकोला येथे अँन्टी करप्शन ब्यूरोच्या कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदविली. लाचेची मागणी केल्यामुळे सापळा रचून १४ ऑक्टोबर रोजी दुपारी आकोट येथील एका हॉटेलवर तडजोडी अंती दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी तलाठी संदीप विठ्ठलराव ढोक यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अँन्टी करप्शन ब्यूरोचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी सांगितले.