शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीन फोडून लाखोंची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 19:54 IST

दिग्रस बु : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चान्नी-वाडेगाव मुख्य मार्गावरील सस्ती येथील बसस्थानकाजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील लाखो रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. मागील दीड महिन्यात सायवणी, चतारी, पिंपळखुटा, खेट्री, चान्नी आदी गावांत चोर्‍या झाल्या आहेत. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सस्तीमधील चोरीची घटना यापैकी सर्वात मोठी आहे. या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

ठळक मुद्देसस्ती येथील घटना गॅस कटरने तोडले शटर

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चान्नी-वाडेगाव मुख्य मार्गावरील सस्ती येथील बसस्थानकाजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील लाखो रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. मागील दीड महिन्यात सायवणी, चतारी, पिंपळखुटा, खेट्री, चान्नी आदी गावांत चोर्‍या झाल्या आहेत. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सस्तीमधील चोरीची घटना यापैकी सर्वात मोठी आहे. या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.   सस्ती येथे १६ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी गस्त घातली होती. त्यानंतर रात्री २ ते ४ वाजताच्या दरम्यान सस्ती येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या एटीएम मशीनजवळ चोरांनी गाडी लावून गॅस कटरने शटर तोडून एटीएममध्ये प्रवेश केला. तेथील एटीएम मशीन फोडून त्यातील अंदाजे १२ लाख रुपयांची चोरी केली असल्याचे वृत्त आहे. या एटीएममध्ये पैसे टाकणार्‍या कर्मचार्‍याने ११ ऑगस्ट रोजी त्यात २१ लाख रुपये टाकले होते. या चोरीच्या घटनेबाबत येथील पोलीस पाटील बदरखे यांनी चान्नी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानंतर चान्नी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर घटनास्थळावर फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांना येथील कॅमेर्‍यावर फिंगर प्रिंट दिसून आल्याचे वृत्त आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही चोरीची या परिसरातील सर्वात मोठी घटना असून, यामुळे परिसरातील गावांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे सस्ती येथील गावकर्‍यांनी एका गुरख्याला नियुक्त केले होते; परंतु तरीही ही चोरी घडली, हे विशेष. सदर गुरखा रात्री गस्त घालत होता. तरीही त्याला चोरटे दिसून आले नसल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, बाळापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला गती दिली आहे. ही चोरी होत असताना जवळ राहणार्‍या वयोवृद्धाने ते पाहिले; परंतु जीवाच्या भीतीने त्याने आरडाओरड केली नाही. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला आहे.