शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

पाणीपुरीच्या गाडीवर काम करणा-या ‘लखन’ची भरारी

By admin | Updated: June 9, 2016 02:01 IST

पाणीपुरीच्या गाडीवर काम करून मिळविले इयत्ता दहावीच्या निकालात ७७ टक्के गुण.

राम देशपांडे/ अकोलाअनंत अडचणींचा सामना केल्यानंतर मिळविलेल्या यशाची गोडी काही औरच असते. महत्प्रयासाने संपादन केलेल्या यशाचं तेज लखनच्या चेहर्‍यावर साफ झळकतं. पाणीपुरीच्या गाडीवर दिवसाला शंभर रुपये मिळविणार्‍या गुरू नानक विद्यालयाच्या लखन बाळू वानखडे या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीमध्ये ७७ टक्के गुण प्राप्त केले आहेत. सोमवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. स्पर्धेची ओढ लागल्यागत शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी ९0 टक्क्यांच्या वर गुण संपादन केले; मात्र या स्पर्धेत अनंत अडचणींचा सामना करीत स्वत:चं अस्तिव सिद्ध करणारे विद्यार्थी काही न्यारेच म्हणावे लागतील. येथील गुरू नानक विद्यालयाच्या लखन बाळू वानखडे या विद्यार्थ्याने पाणीपुरीच्या गाडीवर शंभर रुपये रोजाने काम करून इयत्ता दहावीच्या निकालात ७७ टक्के गुण मिळविले. कैलास टेकडी परिसरात भाड्याच्या खोलीत आई आणि लहान बहिणीसमवेत लखन राहतो. लखनचे वडील बाळू सुदामराव वानखडे छत्तीसगढमधील राजनंदगाव येथे ह्यजयभारतह्ण नामक बँड पार्टीत कामाला आहेत. लग्नसराईनुसार कमाई होत असल्याने लखनच्या वडिलांना जेमतेम घरखर्च भागवणे शक्य होते. या परिस्थितीचा विचार करून वर्षभरापूर्वीच लखनने गौरक्षण मार्गावरील एका पाणीपुरीवाल्याकडे काम मिळविले. शंभर रुपये रोजाने काम करणारा लखन सकाळी शिकवणीला जायचा, दुपारी शाळा आणि सायंकाळी पाणीपुरीच्या गाडीवर. या सर्व धावपळीत लखनने रात्री उशिरापर्यंत जागून किंवा पहाटे लवकरच उठून दहावीचा अभ्यास केला. घरखर्च भागविताना वडिलांवर पडणारा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लखनने घेतलेला निर्णय नक्कीच त्याच्या वयाला साजेसा नाही; पण म्हणतात ना, परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. स्पर्धेच्या या वातावरणात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत लखनने मिळविलेल्या गुणांची टक्केवारी नक्कीच कमी आहे; मात्र ज्या परिस्थितीवर मात करून त्याने हे यश संपादन केले, ते परिश्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे म्हणावे लागेल.