शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील माेकळे प्लाॅट बनले तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:19 IST

अकाेला : शहरासह जिल्ह्यात गत १५ वर्षानंतर एवढ्या माेठ्या प्रमाणात पा्स झाला असून शहरातील विविध भागात माेठ्या प्रमाणात पूर ...

अकाेला : शहरासह जिल्ह्यात गत १५ वर्षानंतर एवढ्या माेठ्या प्रमाणात पा्स झाला असून शहरातील विविध भागात माेठ्या प्रमाणात पूर आला हाेता़ ही पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर शहरातील विविध भागात पाहणी केली असता माेकळ्या प्लाॅटवर माेठ्या प्रमाणात पाणी थांबल्याने या प्लाॅटला सध्या तलावाचे स्वरूप आले आहे़ या तलावांमध्ये म्हशीचा वावर सुरू झाल्याने डासही माेठ्या प्रमाणात आले आहेत़ तलावातील साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले आहे़ अकाेल्यात दाेन दिवस माेठा पूर आल्याने शहरातील विविध भागात पाणी शिरले हाेते़ खडकी परिसरातील अष्टविनायक नगर येथील डुप्लेक्स, प्राजक्ता कन्या शाळेच्या पाठीमागील भाग, काैलखेड यासह जठारपेठ, माेठी उमरी, लहान उमरी, शिवनी, अकाेट फैल, जुने शहर, डाबकी राेड, किराणा बाजार परिसरात पाणीच पाणी साचले हाेते़ या परिसरात अनेक बड्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या माेकळ्या प्लाॅटवर, खुल्या भूखंडांवर प्रचंड प्रमाणात पाणी साचले असून या प्लाॅटला तलावांचे स्वरूप आले आहे़ या माेकळ्या प्लाॅटवर पाणी साचल्याने विविध सरपटणारे जीवजंतू, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे़ त्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले असून साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे़ मनपाने तातडीने पावले उचलून या परिसरातील साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

या भागात अद्यापही अडचणी

शहरातील खडकी परिसरात असलेल्या अष्टविनायक नगर, प्रगती नगर, म्हाडा काॅलनी, काैलखेड येथील प्राजक्ता कन्या शाळेच्या मागील भाग, निमवाडी बसस्थानक परिसर, स्नेह नगर, गीता नगर, गंगा नगर, वाशिम बायपास, माेठी उमरी, विठ्ठल नगर, लहान उमरी, सावंतवाडी, जठारपेठ, न्यू तापडिया नगर, रणपिसे नगर, रविनगर, गुडधी, जुने शहरातील बाळापूर नाका, डाबकी राेड, गाेडबाेले प्लाॅट, डाबकी, शिवनी, शिवर, चांदूर शिवार, आकाेट फैल, अशाेक नगर, दम्मानी हाॅस्पिटल परिसर या परिसरात आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़

रस्त्यांची दयनीय अवस्था

शहरातील चारही भागात लाेकमतच्या चमूने पाहणी केली असता आकाेट फैल, जुने शहर, डाबकी राेड, गीता नगर, गंगा नगर, माेठी उमरी, काैलखेड, खडकी, शिवनी व शिवर परिसरातील अनेक ले-आऊटमध्ये जाण्यासही रस्ता नसल्याचे चित्र आहे़ दुचाकी घेऊन जाणे कठीण असून पायी चालणेही मुश्कील झाले आहे़ या परिसरातील नागरिकांनी या परिसरात रस्त्यांचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी केली आहे़

धूर फवारणी करण्याची मागणी

पूर ओसरल्यानंतर शहरातील बहुतांश माेकळ्या प्लाॅटवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे़ या पाण्यातून आता दुर्गंधी पसरली असून डासांचाही माेठ्या प्रमाणात उच्छाद सुरू आहे़ त्यामुळे शहरातील संपूर्ण परिसरात धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ पावसाळ्यात अद्यापही धूर फवारणी झाली नसल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात सापडले आहे़

प्रतिक्रिया

घरासमसाेर माेठ्या प्रमाणात डबके साचले आहे़ या परिसरात पाच ते सहा माेठे भूखंड व खुले प्लाॅट असून त्यावर पाणी साचले आहे़ त्यात वराहांचा मुक्तसंचार असल्याने घाण पसरत आहे़ काही प्लाॅटवर तर म्हशी बसविण्यात येत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून यावर तातडीने उपाययाेजना करण्यात याव्या़

निर्मला पवार

स्नेह नगर, गीता नगर, अकाेला

काैलखेड व खडकी परिसरात विद्रुपा नदीचा माेठा पूर आला़ त्यामूळे खुल्या भूखंडांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्या पाण्याने आता दुर्गंधी पसरली आहे़ या पाण्यात् सापांचा वावर असल्याचे दिसून येते़ त्यामुळे मुलांना धाेका आहे़ शहरातील खुल्या भूखंडांवर मनपाने कारवाई करावी़, जेणेकरून ज्यांच्या मालकीचे हे भूखंड आहेत ते साफसफाई ठेवतील. पर्यायाने नागरिकांना आराेग्याचा प्रश्न निर्माण हाेणार नाही़

गणेश मानकर

काैलखेड, खडकी अकाेला

आकाेट फैल परिसरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा माेठा गंभीर प्रश्न आहे़ या नाल्यांच्या बांधकामासाठी मनपाने तातडीने पुढाकार घ्यावा़ नाल्यातील घाण पाणी व पावसाचे पाणी एकत्र झाल्यानंतर हे पाणी खुल्या भूखंडांवर साचले आहे़ त्यामुळे पूर्ण परिसरातच डासांचा माेठा उच्छाद असून नागरिकांना साथीच्या आजारांचा धाेका आहे़ तातडीने धूर फवारणी करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे़

रवी शिंदे

सामाजिक कार्यकर्ता, अकाेला