शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

लेडिज सायकल पुरवठ्याच्या फायली गायब!

By admin | Updated: May 2, 2017 00:26 IST

अकोला- जिल्हा परिषदेत पंचायत राज समितीचा दौरा नियोजित असतानाच महिला व बालकल्याण विभागाने २०११-१२ मध्ये राबवलेल्या लेडिज सायकल वाटपाच्या फायली गहाळ असल्याची माहिती आहे.

पीआरसी दौऱ्याच्या धसक्याने कर्मचारी गर्भगळित

सदानंद सिरसाट - अकोलाजिल्हा परिषदेत पंचायत राज समितीचा दौरा नियोजित असतानाच महिला व बालकल्याण विभागाने २०११-१२ मध्ये राबवलेल्या लेडिज सायकल वाटपाच्या फायली गहाळ असल्याची माहिती आहे. त्यामुळे तत्कालीन कर्मचाऱ्यांसह अधिकारीही गर्भगळित झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाने त्यासाठी फौजदारी कारवाईची तयारीही केली होती. नंतर ती मागे पडल्याने या फायलींचे भूत आता नव्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून २०११-१२ मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या मुलींसाठी शंभर टक्के अनुदानावर लेडिज सायकल वाटप योजना राबवण्यात आली. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता झाल्याचा ठपका लेखा परीक्षणात ठेवण्यात आला. त्यावेळी १३ लाख २३ हजार ३०९ रुपये खर्चातून ५०९ नग सायकलींचा पुरवठा आदेश देण्यात आला. या योजनेत ती राबवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कमालीची नियमबाह्यता केली आहे. सोबतच पुरवठादार स्वस्तिक एंटरप्रायजेसला चांगलाच लाभ पोहचवल्याचेही मत नोंदवण्यात आले आहे. त्यातून तत्कालीन संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगलेच उखळ पांढरे केल्याचेही दिसत आहे. त्यामुळेच योजनेच्या फायलीच गहाळ केल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, लेखा परीक्षणासाठी एकही फाइल उपलब्ध करून न देण्याचा उद्दामपणाही संबंधितांनी केला आहे. अटींचे उल्लंघन केल्यानंतरही दंडातून सूटजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने पुरवठादार स्वस्तिक एंटरप्रायजेससोबतच्या करारातील अटीनुसार पुरवठ्याला विलंब झाल्यास प्रति आठवडा विलंबासाठी अर्धा टक्का दराने दंड वसुलीची अट होती; मात्र सायकली पुरवठ्याला तीन आठवडे विलंब झाल्यानंतरही एकाच आठवड्यासाठी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. त्यातही अकोट पंचायत समितीमध्ये सात महिने उशिराने पुरवठा करण्यात आला. त्याचाही दंड वसूल झालेला नाही. अकरावीतील विद्यार्थिंनींना सायकल वाटपयोजनेसाठी २००९ मध्ये अर्ज घेतलेल्या नववीच्या विद्यार्थिनींना २०११ मध्ये सायकल वाटप करण्यात आले. तोपर्यंत त्या अकरावीत गेल्या. तरीही २२ सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यापोटी ६० हजार रुपये वसुलीचा मुद्दाही कर्मचाऱ्यांच्या गळ््यात पडणार आहे.सायकलींचे अतिरिक्त साहित्यही गायबविशेष म्हणजे, दरकरारानुसार सायकलींसोबत अतिरिक्त साहित्य जसे बेल, स्टँड, कॅरिअर, चेन देणे बंधनकारक असताना पुरवठादाराकडून ते मिळाल्याची कुठलीच माहितीही महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली नाही. त्याशिवाय, सायकलींच्या दर्जाबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कोणतेही प्रमाणपत्र न घेताच लाखोंचे देयक अदा करण्यात आले.