शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लाखावर गॅस ग्राहक ‘सबसिडी’पासून वंचित

By admin | Updated: March 15, 2015 01:26 IST

अकोला जिल्ह्यात १.३९ लाख ग्राहकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित.

संतोष येलकर /अकोला : गॅस सबसिडी ची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना गेल्या जानेवारीपासून सुरू करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ४९२ गॅस सिलिंडर ग्राहकांपैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ १ लाख ३९ हजार २२४ ग्राहकांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात १ लाख ३ हजार २६८ ग्राहक गॅस ह्यसबसिडीह्णच्या लाभापासून वंचित आहेत. गॅस सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खाते क्रमांकावर जमा करण्याची योजना गत १ जानेवारीपासून केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये गॅस सिलिंडर ग्राहकांनी वितरकांकडे एका सिलिंडरचे ६६२ रुपये जमा करून, सिलिंडर घेतल्यानंतर संबंधित गॅस सिलिंडर ग्राहकांच्या बँक खाते क्रमांकावर १९८ रुपयांच्या सबसिडीची रक्कम जमा केली जाते. या योजनेत गॅस सिलिंडर ग्राहकांचा ग्राहक क्रमांक आधारकार्ड क्रमांक तसेच बँक खाते क्रमांकाशी संलग्नित असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात इंडेन, हिंदुस्थान व भारत या तीनही गॅस कंपन्यांचे एकूण २ लाख ४२ हजार ४९२ गॅस ग्राहक आहेत. त्यापैकी २७ फेब्रुवारीपर्यंत १ लाख ६७ हजार ४७९ गॅस ग्राहकांचा ग्राहक क्रमांक आधारकार्ड क्रमांकाशी संलग्नित करण्यात आला असून, त्यापैकी १ लाख ३९ हजार २२४ गॅस ग्राहक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित करण्यात आले. उर्वरित १ लाख ३ हजार २६८ गॅस ग्राहकांचे ग्राहक क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित करण्याचे काम अद्यापही बाकी आहे. त्यामुळे ग्राहक क्रमांक आणि आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित न करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाखांवर गॅस सिलिंडर ग्राहकांना गॅस सबसिडीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.