शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

अकोला ‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा; प्रशासनावर उधार-उसनवारीची नामुष्की

By atul.jaiswal | Updated: January 24, 2018 14:49 IST

अकोला: गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासनावर ओढवली आहे.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला.रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासनावर ओढवली आहे.आवश्यक औषध बाहेरून विकत आणण्यासाठीचे ‘प्रिस्क्रिप्शन’ डॉक्टरांकडून दिले जात आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला: गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासनावर ओढवली आहे. रुग्णांची औषधांची गरज भागविण्यासाठी गत काही दिवसांपासून चक्क जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व उपसंचालक, आरोग्यसेवा यांच्याकडून उधार-उसनवारीवर औषधे घेतल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.‘सर्वोपचार’ रुग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज हजारोंच्या संख्येने येणाºया रुग्णांच्या तुलनेत सर्वोपचारमधील सुविधा कमी पडत आहेत. रुग्णालयात बाह्य उपचार विभाग (ओपीडी)मध्ये येणाºया तसेच आंतररुग्ण विभागात भरती असलेल्या रुग्णांना रुग्णालयातूनच औषधे दिली जातात. त्यासाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून औषधांची खरेदी केली जाते. सर्वोपचार रुग्णालयास औषध पुरवठा करणाºया विविध संस्थांची तब्बल साडेआठ कोटी रुपयांची देयके जानेवारी २०१७ पासून थकीत आहेत. त्यामुळे या संस्थांनी आता औषधांचा पुरवठा करण्यात आखडता हात घेतला आहे. परिणामी, रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची केवळ तपासणी करणे, एवढेच काम सुरू आहे. आवश्यक औषध बाहेरून विकत आणण्यासाठीचे ‘प्रिस्क्रिप्शन’ डॉक्टरांकडून दिले जात आहे. खोकला, ताप यासारख्या आजारांचीही औषधे नसल्यामुळे रुग्णसेवा बाधित होत असल्याचे चित्र आहे.‘पीएलए’मधून अदा केली जातात ४० लाखांची बिलेनिधीअभावी रुग्णांचा औषध पुरवठा व इतर साहित्याचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी रुग्णालयाच्या स्वीय प्रपंची खात्यामधून (पीएलए) देयके अदा करण्याची परवानगी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या सहसंचालकांनी राज्यभरातील रुग्णालयांनी दिली आहे. त्यानुषंगाने रुग्णालय प्रशासनाकडून दर महिन्याला ४० लाख रुपयांची बिले अदा केली जातात. यामध्ये आॅक्सिजन, इलेक्ट्रिक, सुरक्षारक्षक पुरविणाºया संस्था व औषध पुरवठा करणाºया संस्थांची देयके अदा केली जातात.खोकल्याचेही औषध मिळेनारुग्णालयातील प्रतिजैवक औषधांचा साठा संपला आहे. खोकला, ताप, पोटदुखी यांसारख्या आजारांचीही औषधे मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागात येणाºया रुग्णांना चिठ्ठ्या लिहून दिल्या जात आहेत. साध्या खोकल्याचेही औषध मिळत नसल्याने रुग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.७० पेक्षा अधिक औषधे उपलब्ध नाहीतअ‍ॅझिथ्रोमायसीन, डायक्लोफेनॅक, पॅरासिटामॉल, अ‍ॅन्टासिड, अ‍ॅमॉक्सिलिन, अ‍ॅल्बेन्डोझोल, सॉर्बिट्रेट, डॉक्सिक्लाईन, झिप्रोफ्लॉक्सिन, रॅन्टिडीन, ईरिथ्रोमायसिन, नॉरफ्लॉक्स आदी जवळवास ७० पेक्षा अधिक औषधे रुग्णालयाच्या भांडारत उपलब्ध नसल्याची माहिती आहे.

भारिप-बमसंचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना निवेदनसर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने तातडीने औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी भारिप-बमसंच्यावतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी पराग गवई, सतीश सिरसाट, संजय सदांशिव, रवी पाटील, दीपक तायडे, संतोष अलाट, अरुण बलखंडे, सतीश वानखडे, राहुल इंगळे, निखिल वानखडे, विशाल वाघ, भूषण खंडारे, नितीन डोंगरे, सुमोद पाटील, भाऊसाहेब अंभोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय