शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

साथरोगांचा उद्रेक अन् हिवताप अधिका-यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडे!

By admin | Updated: November 6, 2014 23:35 IST

अकोला, वाशिम, बुलडाण्यातील स्थिती.

सचिन राऊत/अकोला

       राज्यातील बहुतांश शहरांमध्ये डेंग्यूचे थैमान व जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा उद्रेक झाला असून, त्यावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा हिवताप अधिकार्‍यांच्या कार्यालयांचा कारभार मात्र प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडून चालविल्या जात आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीनही जिल्हय़ातील जिल्हा हिवताप अधिकार्‍यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडे आहे. विशेष म्हणजे बुलडाण्यात साहाय्यक हिवताप अधिकारी कार्यरत असतानाही, जिल्हा हिवताप अधिकार्‍यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञाकडे असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.अकोला शहरासह संपूर्ण जिल्हय़ात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून, दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १३ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. वाशिम व बुलडाण्यातही डेंग्यूने थैमान घातले असून, जलजन्य आजारांचाही उद्रेक झाला आहे. अशा परिस्थितीत तीनही जिल्ह्यांमध्ये जिल्हा हिवताप अधिकार्‍यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडे देण्यात आला आहे. जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा कारभार प्रभारींकडून चालविण्यात येत असून, साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकार्‍यांची पदेही रिक्त आहेत. अकोला व वाशिम जिल्ह्यांमध्ये साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी नसून, बुलडाण्यात साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी कार्यरत असतानाही, प्रयोगशाळा तंत्रज्ञाकडे जिल्हा हिवताप अधिकार्‍यांचा प्रभार आहे. गत दोन वर्षांपासून अकोल्यात जिल्हा हिवताप अधिकारी हे पद रिक्त आहे. साथरोगांचा प्रचंड उद्रेक झाला असताना, हिवताप विभागाकडून काही जिल्हा हिवताप अधिकार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत; मात्र अकोल्यासह वाशिम व बुलडाण्यात प्रभारींच्या खांद्यावरून हा कारभार चालविण्यात येत असून, डेंग्यूच्या उच्चाटनासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना झाल्या नसतानाही, त्यांना नोटीस बजाविण्याकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे.

* अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे साथरोगांचा उद्रेक!साथरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप अधिकारी, साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कीटक अधिकारी, कीटक संग्राहक असणे आवश्यक आह; मात्र हा विभाग केवळ प्रयोगशाळा तंत्रज्ञांमार्फत चालविण्यात येत असल्याने साथरोगांवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. काही जिल्हय़ात केवळ अधिकार्‍यांच्या किरकोळ दुर्लक्षामुळे साथरोगांचा उद्रेक झाला असल्याची माहिती आहे.