अकोला: महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संलग्नित श्रमिक पत्रकार संघ, अकोला शाखेची सभा रविवारी दुपारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेतकरी सदनात उत्साहात पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र (नागपूर) होते. प्रमुख अतिथी म्हणून शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे माजी अध्यक्ष यदू जोशी (मुंबई), महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, माजी अध्यक्ष विश्वास इंदुरीकर, माजी सरचिटणीस विनोद देशमुख व ज्येष्ठ पत्रकार संदीप भारंबे उपस्थित होते.प्रारंभी अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी, श्रमिक पत्रकार संघ अकोला शाखा कार्यकारिणी घोषित केली. यावेळी बोलताना मैत्र यांनी, येणारा काळ पत्रकारांसाठी आव्हानात्मक आहे. देशभरात वृत्तपत्र क्षेत्रातून दररोज पत्रकारांना पत्रकारिता सोडावी लागत आहे.त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान आणि तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे आणि चालत्या काळासोबत चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे सांगत, दरवर्षी आरोग्य सेवेसाठी गरजू पत्रकारांना २0 ते २५ लाख रुपयांची मदत देणारा, निवृत्त पत्रकारांना सन्मानजनक पेंशन देणारा, श्रमिक पत्रकार संघ देशातील एकमेव असल्याचे ते म्हणाले.
अकोल्यात श्रमिक पत्रकार संघाची स्थापना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:15 IST