शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेवेत रुजू होण्यापूर्वीच अपहाराचा ठपका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:04 IST

ग्रामसेवकाने केलेल्या अपहारातील रकमेची वसुली तब्बल १५ अधिकाऱ्यांवर लावण्यात आली.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासकीय कामकाजात कधी कोणता चमत्कार घडेल, याचा काहीच नेम नाही. कधी ध चा मा केला जातो, तर कधी नको ते उपद्व्याप केल्याने अनेकांना अन्याय सहन करण्याची वेळही येते. असाच प्रकार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात गत ३० वर्षांपासून घडत आहे. ग्रामसेवकाने केलेल्या अपहारातील रकमेची वसुली तब्बल १५ अधिकाऱ्यांवर लावण्यात आली. त्यामध्ये एक अधिकारी त्या काळात सेवेत रुजूही झाला नव्हता, तर एकाचा मृत्यू झाल्यानंतर बजावलेल्या नोटीसचे स्पष्टीकरणही प्राप्त झाले. ते असमाधानकारक मानून दंडात्मक वसुलीची नोटीस देण्याचा प्रकार घडला आहे.तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत तत्कालीन ग्रामसेवक गाडेकर यांच्यावर जवाहर रोजगार योजनेत अपहार केल्याने वसुली सुरू झाली. १९८९ पासून वसुलीची कारवाई सुरू होती. दरम्यान, सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीही देण्यात आली. त्याचवेळी त्यांच्याकडे असलेल्या अपहारित रकमेच्या वसुलीचा मुद्दा विभागीय आयुक्तांकडे गेला. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी योग्य पद्धतीने चौकशी करून कारवाईचा आदेश दिला; मात्र तेथेच जिल्हा परिषद प्रशासनाने घोळ केला. प्रकरणात १९९८-९९ पासून कारवाईची प्रक्रिया सुरू होती. २००८-०९ पर्यंतही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यावेळी या प्रकरणात तब्बल १५ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यामध्ये तेल्हारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, सहायक लेखाधिकारी, विस्तार अधिकाºयांचा समावेश आहे. त्या सर्वांना याप्रकरणी जबाबदार धरण्यात आले, तर ग्रामसेवक गाडेकर यांना निर्दोष सोडण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणी चौकशी केली, अहवाल कोणाकडे आहे, याबाबत संबंधितांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.मयताने दिले नोटीसचे स्पष्टीकरणया प्रकरणात सहायक लेखाधिकारी म्हणून सिन्हा नामक अधिकाºयाला नोटीस बजावण्यात आली. ते हयात नसताना त्यांना नोटीस देण्यात आली. त्यातही कळस म्हणजे, त्यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचेही प्रशासनाने ठरविल्याची नोंद फाइलमध्ये करण्यात आली. हा प्रकार पंचायत विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा ठरला आहे.अपहारासाठी वसुलीसाठी नोटीस विस्तार अधिकारी म्हणून तत्कालीन विस्तार अधिकारी कालिदास तापी यांनाही नोटीस बजावण्यात आली. तापी जिल्हा परिषदेच्या सेवेत १९९४ मध्ये रुजू झाले, तर ग्रामसेवकावर १९८९ पूर्वीची वसुली आहे. त्यामध्ये तापी यांना जबाबदार धरून ७० हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूलपात्र ठरविण्यात आली.तत्कालीन गटविकास अधिकारी उद्धव खंडाळे २००२ मध्ये तेल्हारा पंचायत समितीमध्ये रुजू झाले होते. त्यांच्यावरही वसूलपात्र रक्कम निश्चित करण्यात आली. या प्रकाराने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात चांगलाच चमत्कार घडला आहे.