शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात २११ ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 12:56 IST

अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२८ गावांचा समावेश असून, या गावांच्या २११ ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित करण्यात आल्या.

अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२८ गावांचा समावेश असून, या गावांच्या २११ ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित करण्यात आल्या असून, समितीच्या सदस्यांना ६ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ८३ ठिकाणी प्रकल्प अंमलबजावणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) राजेंद्र निकम यांनी मंगळवारी दिली.खारपाणपट्टा आणि आणि हवामान बदलामुळे बळी पडणाºया गावांसाठी शासनामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील ४९८ गावांची निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात १०५ गावांमध्ये योजनेंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत. दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील ३२८ गावांचा समावेश असून, या गावांच्या २११ ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समित्या ग्रामसभांच्या मान्यतेने स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रकल्प योजनेची अंमलबजावणी या समित्यांद्वारे होणार असल्याने, समित्यांच्या सदस्यांना प्रकल्प अंमलबजावणीचे प्रशिक्षण ६ फेबु्रवारी रोजी आॅनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील ८३ ठिकाणी एकाच वेळी देण्यात येणार आहे. वातावरण बदलामुळे होणाºया नुकसानासंदर्भात प्रकल्पातील गावांना सक्षम करण्यासाठी आवश्यक असणाºया पीक पद्धती, कृषी पूरक व्यवसाय, मृद संधारण, गटांचे बळकटीकरण, ग्राम कृषी संजीवनी समितीचे कर्तव्य व जबाबदारी आणि योजना राबविण्याची कार्यपद्धती इत्यादी विषयांची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात समिती सदस्यांना देण्यात येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निकम यांनी सांगितले. त्यावेळी अकोल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी उपस्थित होते.समिती सदस्यांना ८३ ठिकाणी दिले जाणार प्रशिक्षण!जिल्ह्यातील २११ ग्रामपंचायत स्तरावर गठित करण्यात आलेल्या ग्राम कृषी संजीवनी समित्यांच्या सदस्यांना एकाच वेळी जिल्ह्यातील ८३ ठिकाणी प्रकल्प अंमलबजावणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात १४, मूर्तिजापूर तालुक्यात २०, बार्शीटाकळी तालुक्यात २, अकोट तालुक्यात १७, बाळापूर तालुक्यात १३, पातूर तालुक्यात २ व तेल्हारा तालुक्यात ९ ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती