शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोविड योद्ध्यालाच नाकारला घरमालकाने प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:43 IST

निगेटिव्ह आल्यानंतरही घरमालकाने घरात प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विरुद्ध लढत असताना डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी रात्रंदिवस झटत आहेत; मात्र त्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याच्या काही वाईट अनुभवांनाही या कोविड योद्ध्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच काहीसा वाईट अनुभव एका महिला डॉक्टरला आला असून, निगेटिव्ह आल्यानंतरही घरमालकाने घरात प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे.कोरोना विरुद्धच्या लढ्यात नियमित डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय विद्यार्थीही विना मानधन गत दोन महिन्यांपासून रुग्णसेवा देत आहेत. हे वैद्यकीय विद्यार्थी स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करता संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेत आहेत. दरम्यान, काही डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचारी स्वत: देखील कोरोनाचे शिकार झाल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या सहकाºयांच्या संपर्कात आल्याने अनेकांनी कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या. त्यात एका महिला डॉक्टरचाही समावेश असून, तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. स्वॅब घेतल्याने ती महिला डॉक्टर काही दिवस सर्वोपचार रुग्णालयातील हॉस्टेलमध्येच राहिली होती; परंतु दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ती राहत्या घरी परतली, तेव्हा घरमालकाने तिला घरात प्रवेश नाकारल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. एका वैद्यकीय अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून,त्या महिला डॉक्टरला घरात प्रवेश नाकारल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने न्याय मिळवून दिला; परंतु कोविड योद्ध्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अन् त्यांना मिळणारी वागणूक हा चिंतेचा विषय असून, समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ते घरमालक स्वत: डॉक्टर!कोविड योद्ध्यांना समाजातील विविध घटकांकडून वाईट अनुभव आले आहेत; मात्र चक्क एका डॉक्टरकडूनच असा अनुभव येणे धक्का देऊन जाणारा आहे. त्या महिला डॉक्टरचा घरमालक स्वत: डॉक्टर असल्याची माहिती आहे.त्या डॉक्टरांना अद्यापही मानधन नाहीकोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेण्यासोबतच रुग्णांची वैद्यकीय तपासणी करणारे हे आंतरवासीता डॉक्टर गत दोन ते अडीच महिन्यांपासून विना मानधन निरंतर रुग्णसेवा देत आहेत. मध्यंतरी त्यांना मानधन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु अद्यापही त्यांच्या मानधनाचा प्रश्न निकाली लागला नाही.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या