शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात होणार १०० खाटांचे कोविड हॉस्पिटल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

अकोला : जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असून, त्यांना ऑक्सिजनच्या खाटांसाठी ...

अकोला : जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असून, त्यांना ऑक्सिजनच्या खाटांसाठी शोधाशोध करावी लागते. मात्र, खाटांची ही शोधाशोध कमी होणार आहे. आरोग्य विभागामार्फत आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी १०० खाटांचे एक कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असून, त्याच्या हालचालींंना वेग आल्याची माहिती आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ही रुग्णालये टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही कोविडच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण व त्यांचे नातेवाइकांची ऑक्सिजन खाटांसाठी सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयात शोधमोहीम सुरू असते. त्यामुळे उपचारास विलंब होत असून, अनेकांची प्रकृती गंभीर होते. त्यामुळे उशिरा उपचार सुरू झाल्याने अनेक रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाहीत. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागामार्फत आता तालुका स्तरावरच १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून हालचालींना सुरुवात झाली असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रुग्णालयांसाठी पातुर, बार्शिटाकळी, बाळापूर, अकोट आणि तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये जागा निश्चित करण्यात आली असून, येत्या १५ ते २० दिवसांत ही रुग्णालये सुरू होणार असल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

मुर्तिजापूर कोविड रुग्णालयात ३० खाटा वाढविणार

मुर्तिजापूर येथे ७० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू आहे. हे रुग्णालय देखील १०० खाटांचे करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने येथेही ३० खाटा वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय अकोला तालुक्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय व तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रत्येकी ५० खाटांची कोविड रुग्णालये यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत.

सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम आणि ‘सीपॅप’ यंत्रणा असणार कार्यान्वित

तालुकास्तरावर सुरू करण्यात येणाऱ्या सर्वच १०० खाटांच्या रुग्णालयांमध्ये सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन खाटांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या व्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी या रुग्णालयात ‘सीपॅप’ यंत्रणाही कार्यान्वित राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही प्रणाली व्हेंटिलेटरचे काम करत असल्याने गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होणार आहे.

प्रत्येक तालुक्यात १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमसह सीपॅप यंत्रणाही कार्यान्वित असणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, ती पूर्णत्वास आल्यानंतर रुग्णालय सुरू करण्यात येतील. रुग्णालयांसाठी जागा निश्चित करण्यात आली असून, रुग्णालयासाठी आवश्यक साहित्याची ऑर्डरही देण्यात आली आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला