शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक सामन्यावर कोट्टय़वधींचा सट्टाबाजार

By admin | Updated: June 5, 2017 02:10 IST

जिल्हय़ात ५0 च्यावर सट्टा माफियांचे जाळे

सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळख असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रविवारी खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर अकोला शहरासह जिल्हय़ात कोट्टय़वधी रुपयांच्या सट्टय़ाची उलाढाल झाली. जिल्हय़ात तब्बल ५0 च्यावर सट्टा माफिया सक्रिय झाले असून, त्यांनी रविवारच्या सामन्यावर मोठय़ा प्रमाणात सट्टाबाजार चालविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.जिल्हय़ातील सट्टा माफियांचे जाळे राज्यासह देशपातळीवर आहेत. क्रिकेट सामन्यांवर मोठय़ा प्रमाणात सट्टाबाजाराची उलाढाल होत असल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा अकोल्यात दाखल होताच त्यांनी सट्टा माफियांच्या मुसक्या आवळल्या होत्या. बड्या सट्टा माफियांवर कायद्याचा बडगा उगारत मीणा यांनी अकोल्यातील सट्टा माफियांना पळता भुई थोडी केली, त्यामुळे सट्टा माफियांनी त्यांचे बस्तान गुंडाळत अकोल्यातून हा धंदा बंद केला होता; मात्र त्यांची बदली झाली आणि नव्यानेच आलेल्या पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हय़ातील गुन्हेगारीचा पूर्ण अभ्यास सुरू केला.याच संधीचा फायदा घेत सट्टा माफियांनी काही पोलीस अधिकार्‍यांशी सलगी करीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळल्या जाणार्‍या क्रिकेट मॅचवर सट्टाबाजार चालविण्याचा मोठा गोरखधंदा पुन्हा सुरू केला. सट्टा माफियांचा मोठा बाजारच जिल्हय़ात सुरू असताना एकाही पोलीस अधिकार्‍याकडून कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. एक हजार आणि दोन हजार रुपयांची दारू पकडण्यातच पोलीस धन्य मानत असल्याचे त्यांच्या कारवाईवरून दिसून येत आहे. जिल्हय़ात भारत-पाकिस्तान सामन्यावर कोट्टय़वधी रुपयांचा सट्टाबाजार सुरू असतानाही पोलीस अधिकार्‍यांना याची माहिती नसणे, हे आश्‍चर्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तब्बल ५0 च्यावर सट्टा माफियांकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टाबाजार खेळण्यात आल्याचे वास्तव आहे. शहरासह जिल्हय़ात ही मोठी उलाढाल रविवारी दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंंत सुरू असताना पोलीस मात्र मूग गिळून बसले होते.सामन्यादरम्यानच्या पावसावरही मोठा सट्टा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान नऊ ओव्हर झाल्या असतानाच पाऊस आला. त्यानंतर पूर्ण सामना होईपर्यंंत किती वेळा पाऊस येईल, यावरही सट्टा खेळण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ५0 ओव्हरचा खेळण्यात येणारा सामना किती ओव्हरचा खेळल्या जाईल, यावरही सट्टाबाजारात मोठी उलाढाल झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासोबतच पाकिस्तानने टाकलेल्या अंतिम षटकातील तीन षटकारांवर लाखोंची उलाढाल झाली.