शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोंडवाडे रिकामे, गुरे रस्त्यावर

By admin | Updated: August 12, 2014 01:09 IST

मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करा!

अकोला : शहरातील रस्त्यांवर जागोजागी मोकाट गुरांनी उच्छाद मांडला असताना महापालिकेचे कोंडवाडे मात्र सताड रिकामे पडले आहेत. मोकाट गुरे, श्‍वानांचा अकोलेकरांना प्रचंड त्रास होत असल्यामुळे प्रभारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी मोकाट गुरांच्या समस्येकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी अकोलेकर करीत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या मधोमध जनावरांनी ठिय्या मांडल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा जनावरांमुळे अनेकदा किरकोळ अपघात घडत आहेत. शहरातील मोकाट गुरे, श्‍वान पकडण्याची जबाबदारी मनपाच्या कोंडवाडा विभागावर असली तरी कोंडवाडा विभागाचे कर्मचारी दिवसभर करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. मोकाट गुरांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून, याविषयी कोंडवाडा विभाग प्रमुख सुरेश अंभोरे यांच्याकडे असंख्य तक्रारी केल्या जात आहेत. या तक्रारींवर थातूरमातूर कारवाई करून वेळ निभावून नेण्यात कोंडवाडा विभागाचे कर्मचारी पटाईत झाल्याचा आरोप होत आहे. अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणारे लाखो रुपये या विभागावर नाहक खर्च होत असल्याचा सूर जनमानसात उमटत आहे.

** इंधन खर्चावर उधळपट्टी कोंडवाडा विभागाकडे मोकाट गुरे-कुत्रे पकडण्यासाठी एक वाहन (वाहन क्र.५0२८) उपलब्ध आहे. जनावरे पकडण्याच्या नावाखाली या वाहनाच्या इंधन खर्चापोटी महिन्याला हजारो रुपयांची उचल केल्या जाते. मागील तीन महिन्यात ४0 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची उचल मनपातून करण्यात आल्याची माहिती आहे.

** दोन कोंडवाडे अन तेही रिकामे मोकाट गुरे पकडून त्यांना ठेवण्यासाठी दोन कोंडवाडे आहेत. जुने शहरातील शिवाजीनगर व आकोट फैल परिसरातील अशोकनगरमध्ये हे कोंडवाडे असून, त्यामध्ये जनावरेच नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी महापालिकेने चौकीदार नियुक्त केले आहेत.

** नागरिक त्रस्त, मनपा सुस्त अतिक्रमण व स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने लघू व्यावसायिकांसह उपाहारगृह संचालकांना बेदम केले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच असल्याने उपाहारगृह संचालकांजवळून दंड वसूल केल्या जात आहे. मनपाच्या कारवाईला कोणाचा विरोध नसला तरी नागरिकांच्या समस्यांकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, मोकाट गुरे व श्‍वानांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.