आकोट(जि. अकोला), दि. १६ : आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आकोलखेड येथे कॅरम खेळण्याच्या वादावरून चाकू हल्ला तसेच जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकोलखेड येथे १५ ऑगस्ट रोजी कॅरम खेळण्यावरून वाद होऊन फिर्यादी अनिल रवींद्र डोहळे (२८) याला आरोपी ज्ञानेश्वर डिगांबर कावरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू मारुन जखमी केले, तसेच जिवाने मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. यावरून आरोपी ज्ञानेश्वर कावरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर ज्ञानेश्वर डिगांबर कावरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून आपणांस जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली, अशा तक्रारीवरून आरोपी पंकज रवींद्र डोहळे, सुधीर रामदास डोहळे, लोकेश हरीश डोहळे, सचिन पुरुषोत्तम डोहळे यांच्या विरुद्ध भादंवि २९४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कॅरम खेळण्याच्या वादातून चाकू हल्ला
By admin | Updated: August 17, 2016 02:31 IST