शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाटातील मृतदेह किसन चौधरी याचा

By admin | Updated: February 15, 2016 02:29 IST

अज्ञात मृतदेह प्रकरणात चौकशीची दिशा बदलली.

बुलडाणा: राजूर घाटात सापडलेल्या दोन मृतदेह प्रकरणातील तपासाला हळूहळू दिशा मिळत असून, ते मृतदेह मनीषसिंग क्षेत्रीय व आदर्श गंगाराम यांचे नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, दोन्ही मृतदेहांपैकी एक मृतदेह राजस्थान येथील किसन चौधरी यांचा असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. हा मृत किसन चौधरी आसाराम बापूंचा साधक असल्याचे समजते. या मृतदेहप्रकरणी चार दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोघा संशयितांना मुंबई येथून ताब्यात घेतले होते; मात्र त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांना पोलिसांनी सोडून दिले आहे.आता या नव्या खुलाशामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचीच दिशा बदलत ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी येथील राजूर घाटात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. शवविच्छेदन अहवालातही या दोघांच्या मृ त्यूचे कारण कळू न शकल्याने आणि घटनास्थळी आढळून आलेल्या उत्तर प्रदेशातील मतदान कार्ड आणि छत्तीसगड राज्यातील एटीएम कार्डमुळे पोलिसांसाठी हा तपास गुं तागुंतीचा ठरला आहे. तपास अधिकार्‍यांची दिशाभूल करण्यासाठी पद्धतशीरपणे खोटे पुरावे घटनास्थळी ठेवले गेले असावेत, असा कयास पोलीस व्यक्त करीत आहेत. दरम्यान, एपीआय रविराज जाधव यांच्या नेतृत्वात एक पथक उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात जाऊन आले. छत्तीसगड आणि उत्तरप्रदेशमध्ये गेलेल्या पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मृतदेहाजवळ सापडलेला मोबाइल मुंबई येथून विकत घेतल्याचे आणि बिलावर किसन चौधरी असे नाव असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे एक मृतदेह हा किसन चौधरीचा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. किसन चौधरीचा आसाराम बापंच्या आश्रमाशी संबंध आहे काय, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.