अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे आंतर महाविद्यालयीन मुष्टियुद्ध स्पर्धा झाली. या स्पर्धेत श्री राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंनी २ सुवर्ण व १ रौप्यपदक पटकाविले.यामध्ये किरण बजर हिने ६४ ते ७५ किलो वजनगटात, हर्षा अग्रवाल हिने ८१ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले. तसेच भाग्यश्री लकडे हिने ४५ ते ४८ किलो वजनगटात रौप्यपदक पटकाविले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता अमरावती विद्यापीठ संघात खेळाडूंची निवड झाली आहे. प्रशिक्षक राजकुमार परदेशी, प्राचार्य डॉ. विजय नानोटी, राजेश चंद्रवंशी यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.
किरण व हर्षा सुवर्णपदकाच्या मानकरी
By admin | Updated: January 8, 2015 00:31 IST