शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

किडनी तस्करी प्रकरणाच्या चौकशीत आरोग्य संचालकांचा खोडा!

By admin | Updated: February 24, 2016 01:43 IST

पाच वेळा पत्र देऊनही स्पष्ट मार्गदर्शन मिळेना; डॉक्टरांना वाचविण्यासाठी आटापिटा.

अकोला: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या किडनी तस्करी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोग्य संचालकांना पाच वेळा पत्र देऊन मार्गदर्शन मागण्यात आले आहे; मात्र आरोग्य संचालकांनी गत दोन महिन्यांमध्ये या प्रकरणातील पुढील कारवाईसंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन न केल्याने तपासात खोडा निर्माण झाला आहे. आरोग्य संचालक स्पष्ट मार्गदर्शन न करीत असल्याने किडनी तस्करी प्रकरणात अवयव तस्करीसह विविध गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना अडचणी येत आहेत.डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आनंद जाधव, देवेंद्र शिरसाट व किडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी या तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आलेल्या पुराव्यावरून कलम ३७0 नुसार गुन्हय़ात वाढ करण्यात आली; मात्र आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात तांत्रिक मुद्यांची उकल करण्यासाठी तसेच मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार आणखी कोणते गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राज्याचे आरोग्य संचालक सतीश पवार यांना ५ डिसेंबर २0१५ पासून ते आतापर्यंंत ५ वेळा पत्र देऊन मार्गदर्शन मागितले. दोन महिने या पत्राला केराची टोपली दाखविणार्‍या आरोग्य संचालकांनी ६0 ते ६५ दिवसानंतर थातूर-मातूर उत्तर पाठविले असून, त्यामध्ये किडनी तस्करांवर तसेच दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी किंवा करू नये, हे स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे या तपासात आता आरोग्य संचालकांनीच खोडा निर्माण केला असून, अवयव तस्करीचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना अडचणीत आणले आहे. या प्रकरणात आरोग्य संचालकांनी नियमाने अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट पत्र न्यायाधीशांच्या नावे किंवा पोलिसांना देणे अपेक्षित आहे; मात्र दोन महिन्यांच्या कालावधीनंतरही हे स्पष्ट पत्र न दिल्याने किडनी तस्करी प्रकरणाचा तपास थंडावलेला आहे. आरोग्य संचालकांनी डॉक्टरांना वाचविण्यासाठी हा आटापिटा सुरू केल्याची माहिती असून, त्यामुळेच त्यांनी हे प्रकरण अडगळीत ठेवल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.