शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

By admin | Updated: March 13, 2017 02:39 IST

नेरधामणा, उमा बॅरेजचे कामही थंडबस्त्यात!

अकोला, दि. १२- जिल्हय़ातील शापित खारपाणपट्टय़ात सिंचन प्रकल्पाची कामे रखडली आहेत. नेर-धामणा, उमा, काटेपूर्णासह सर्वच बॅरेजची कामे ठप्प पडली आहेत. सातत्याने खारेपाणी व पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना या बॅरेजमुळे दिलासा वाटत होता; पण कामेच बंद पडल्याने शेतकर्‍यांचे लक्ष या बांधकामाकडे लागले आहे.खारपाणपट्टय़ातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. आरोग्यासाठी घातक असलेले हे पाणी पिकांवर परिणाम करणारे असल्याने या भागात धरणं व्हावीत, असे सातत्याने प्रयत्न झाले; पण या भागातील भूगर्भात ४0 ते ५0 मीटर खाली खडक नसल्याने धरण होऊ शकत नाही, असे सात त्याने जलसंपदा विभागाच्या विविध तज्ज्ञ समित्यांकडून सांगण्यात येत हो ते. यावर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे ठरले. सुरुवातीला नेरधामणा बॅरेजचे काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आल्या. अखेर येथील कंत्राटदाराकडून या बॅरेजच्या कामाची मागील सात वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. खारपाणपट्टय़ातील पहिले बॅरेज आहे, जे डायफाम वॉलवर उभे करण्यात आले. सध्या या बॅरेजचे काम थंडबस्त्यात पडले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार्‍या नेरधामणा बॅरेजनंतर खारपाणपट्टय़ात बॅरेजची शृंखला तयार करण्यात आली आहे. अकोला जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा बॅरेज, नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेज आहे. या बॅरेजला लागूनच मूर्तिजापूूर तालुक्यात घुंगशी बॅरेज आहे. या बॅरजेच्यावर काटेपूर्णा बॅरेज काटेपूर्णा नदीवर होणार आहे. लागनूच उमा बॅरेज आहे. या बॅरेजच्यावर अमरावती जिल्ह्यात पूर्णा बॅरेज आहे. या सर्व बॅरेजचे काम थंडबस्त्यात आहे. या शृंखलेत काटीपाटीच्या बॅरेजचे काम रखडले आहे. बॅरेज झाल्यास ८.२४ दलघमी जलसाठा संकलित होईल, तसेच १८00 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल.काटीपाटी बॅरेजची किंमत वाढली!शृंखलेला पूर्ण करणार्‍या काटीपाटी बॅरेजचे काम रखडले आहे. काटी पाटीची व्यवहार्यता तपासून काम सुरू करावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दोनदा दिलेला आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने या शृंखलेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिमाणी, काटीपाटी प्रकल्पाची किंमत सातत्याने वाढत असून, ६५ कोटींचे हे बॅरेज आता ३२५ कोटींचे झाले आहे.