शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचा २८ टक्के खत साठा गोदामातच!

By admin | Updated: October 13, 2016 03:07 IST

एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे.

अकोला, दि. १२- खरीप हंगामात पिकांसाठी लागणार्‍या खतांचा वापर बराच घटला आहे. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे. २८ टक्के साठा गोदामातच पडून आहे. त्यामुळे वापर कमी होण्याच्या कारणांचा शोध उत्पादक कंपन्या घेत आहेत. त्यातच आता रब्बी हंगामासाठी मागणीच्या ६५ टक्केच खत देण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंंत विविध खतांचा ६७0८५ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला. त्यामध्ये गेल्यावर्षीचा शिल्लक १५३७२ मे.टन मिळून एकूण ८२४५७ मे.टन साठा झाला. त्यापैकी आतापर्यंत ५९७५८ मे.टन खतांची विक्री झाली. एकूण उपलब्ध साठय़ाशी हे प्रमाण ७२ टक्के आहे. २८ टक्के खते गोदामातच पडून आहेत. म्हणजे, २२६६९ मे.टन खतांची उचलच झालेली नाही. रासायनिक खते उत्पादक कंपन्यांसाठी ही बाब चिंतेची झाली आहे. गेल्या यापूर्वी हंगामात खतांसाठी शेतकर्‍यांची कमालीची धावपळ व्हायची. काही वेळा तर पोलीस बंदोबस्तात खतांची विक्री करण्याची वेळ आली होती. त्यानंतर शेतकर्‍यांच्या थेट बांधावर खते देण्याचा निर्णयही शासनाला घ्यावा लागला होता. या परिस्थितीत चालू वर्षात खतांच्या वापराचे प्रमाण कमालीचे घटले. खतांच्या समतोल वापरासाठी शेतकर्‍यांना जागरुक केले जात आहे. माती परीक्षणामुळे त्या शेतात आवश्यक घटक असलेली खतेच दिली जात आहे. यामुळे काही प्रमाणात खत वापरामध्ये र्मयादा आल्या आहे. त्यासाठी शेतकर्‍यांची जागरुकता वाढण्याची गरज आहे. आरसीएफकडून त्यासाठी किसान सुविधा केंद्र सुरू केली जात आहेत. - सतीश वाघोडे, उपप्रबंधक, आरसीएफ, अकोला विभाग.