शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील खदानींचा आता होणार लिलाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:48 IST

अकोला: भाडेपट्ट्यांवर देण्यात येणाऱ्या राज्यातील खदानींचा आता लिलाव करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत २३ जानेवारी रोजी निर्णय घेण्यात आला असून, लिलावाची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला: भाडेपट्ट्यांवर देण्यात येणाऱ्या राज्यातील खदानींचा आता लिलाव करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत २३ जानेवारी रोजी निर्णय घेण्यात आला असून, लिलावाची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे.शासकीय किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या जमिनीवरील खदानी भाडेपट्ट्याने देण्यात येत होत्या. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील नियम ९ अंतर्गत तरतुदीनुसार वाळू व्यतिरिक्त मुरूम, दगड इत्यादी गौण खनिजाच्या खनिपट्ट्यांचा (खदानी) लिलाव करण्याचा निर्णय शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत २३ जानेवारी रोजी घेण्यात आला आहे. खदानींचा लिलाव करण्यासाठी कार्यपद्धती आणि अटी व शर्तीदेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खदानींचा लिलाव करण्यात येणार आहे. लिावासाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धीनुसार राज्यातील गौण खनिजाच्या खनिपट्ट्यांचे (खदानी) लिलाव ‘ई-टेंडरिंग, ई-आॅक्शन’ पद्धतीने करण्यात येणार आहेत. खदानींच्या लिलावाचा कमाल कालावधी पाच वर्षांचा राहणार असून, हा कालावधी लिलावधारकासोबत करारनामा केल्याच्या दिनांकापासून सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील खदानींचा लिलाव जिल्ह्याच्या मुख्यालयी शक्यतोवर एकाच दिवशी करण्यात येणार आहे. सर्व खदानींचे लिलाव संबंधित जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकाºयांच्या व्यक्तिगत नियंत्रणात व देखरेखीत पार पाडण्याच्या सूचनाही शासन निर्णयात देण्यात आल्या.उत्खननासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक!महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील नियम १० (४) मधील तरतुदीनुसार खदानींचा लिलाव करण्यापूर्वी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची (ग्रामसभेची) शिफारस घेणे आवश्यक आहे. ग्रामसभेची शिफारस प्राप्त झाल्यानंतरच खदानींचा लिलाव करण्यात यावे, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

२३ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात शासकीय जमिनीवरील खदानींचा लिलाव करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार