शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

साहाय्यक बीडीओंच्या हाती गोपनीय अहवालाची चाबी!

By admin | Updated: November 6, 2014 23:04 IST

जबाबदारी निश्‍चित: तीन भागात विभागणी.

वाशिम : पंचायत समिती स्तरावरील कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या गोपनीय नोंदी अहवालावर घेण्याची जबाबदारी शासनाने आता साहाय्यक गट विकास अधिकारी (बीडीओ)वर टाकली आहे. साहाय्यक बीडीओंच्या कामांच्या वाटपामध्ये एकसुत्रता आणणारा आदेश, शासनाने ३0 ऑक्टोबर रोजी जारी केला असून, त्यानुसार साहाय्यक बीडीओंच्या कामांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर कामकाजात सुसुत्रता आणण्यसाठी, तसेच कामकाजाची विभागणी करण्यासाठी, राज्य शासनाने दीड वर्षांपूर्वी साहाय्यक बीडीओचे पद निर्माण केले. राज्यभरातील सर्व पंचायत समित्यांसाठी साहाय्यक बीडीओची ३५१ पदे निर्माण करण्यात आली. त्या पदाच्या कामाबाबत मार्गदर्शक सूचनादेखील त्यावेळी देण्यात आल्या होत्या; मात्र बहुतांश पंचायत समित्यांमध्ये साहाय्यक बीडीओंच्या कामाच्या वाटपामध्ये एकसूत्रता नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. काम वाटपामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने विभाग, जिल्हा व गट स्तरावरील अधिकार्‍यांकडून काम वाटपाबाबत प्रस्ताव मागण्यात आले होते. त्या प्रस्तावांची विभाग स्तरावर तपासणी करून, साहाय्यक बीडीओच्या काम वाटपाचा सुधारित आदेश शासनाने ३0 ऑक्टोबर रोजी जारी केला. नवीन आदेशानुसार, साहाय्यक बीडीओंच्या कामांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावरील कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन या चार विषयांचा स्वतंत्र कार्यभार साहाय्यक बीडीओकडे सोपविण्यात आला आहे. त्या विषयांचे संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय अधिकार साहाय्यक बीडीओकडेच असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावरील सर्व आस्थापनाविषयक बाबी, पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करणे, पंचायत राज समितीचा अनुपालन अहवाल, लोकलेखा समितीचे अनुपालन अहवाल, ग्रामपंचायतीच्या कायदेशीर बाबी, ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व ग्रामसभांचे संनियंत्रण, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, यशवंत पंचायत राज अभियान, पंचायत समिती स्तरावरील कायदेविषयक बाबी नियंत्रण आदी विषय साहाय्यक बीडीओंच्या मार्फत गट विकास अधिकार्‍यांकडे सादर करण्याचे बंधनही नवीन नियमाने घालून दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी, विभागीय स्तरावर उपायुक्त (आस्थापना) आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.