बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास दडलेला आहे. त्यामुळे हा इतिहास जिवंत ठेवण्याची मोठी जबावदारी बुलडाणा जिल्ह्याची आहे. हे आव्हान तुम्हा आम्हाला भविष्यात पेलावे लागणार असल्याचे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. जनकल्याण नागरी सह.पतसंस्था व गर्दे वाचनालय, यांच्या संयुक्त विद्यामाने जिजामाता क्रिडा व व्यापारी सकुंल येथे ११ जानेवारी रोजी सायंकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंपरे यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व्यासपिठाहून बोलत होते. यावेळी त्यांचे मानसपुत्र गणेश ढालपे यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपातुन इतिहास उलगडला.बाबासाहेब पुढे बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज बुलडाणा जिल्ह्याचे नातू लागता. तसेच ते जिल्ह्याचे जावई सुद्ध आहे. छत्रपतींचा पहीला सरसेनापती हा जिल्ह्यातील वरंवड येथील असल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात त्याच्या आजही पाऊलखुणा आहे. शिवाय शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाऊ यांचे माहेर सिंदखेडराजा हे सुद्ध किर्तीवान आणि कर्तुत्वान होते. सन १८00 ते १९00 या दरम्यान शिवचरित्रावर केवळ बखरी उपलब्ध होत्या. यानंतर भारतात आलेल्या एका इंग्रज अधिकार्यांनी अभ्यास करुन पुरवा गोळा केले. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपुर्ण माहिती देणारे कागदपत्र आणि गागाभट्ट यांनी संस्कृतमध्ये लिहीलेला ग्रंथ इंग्लडमध्ये उपलब्ध आहे. ही आपल्या महाराष्ट्रसाठी मोठी शोकांतिका असल्याचे शल्य त्यांनी व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवरायच्या पुतळयाला वंदन करण्यात आले. यावेळी अँड.व्ही.डी.पाटील व रमेश कोरडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार केला.
छत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवा
By admin | Updated: January 12, 2015 01:43 IST