शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बचत खात्यात पुरेशी रक्कम ठेवा, अन्यथा दंड! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:26 IST

अकोला : बचत खात्यात तीन महिन्यांच्या कार्यकाळात किमान एक हजार एवढी रक्कम नसल्यास १८0 रुपये दंड भरावा लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असून, बँकांच्या विविध शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नव्याने लागलेल्या या नियमावलीमुळे बँक खात्यांवर अतिरिक्त भुर्दंड टाकल्या जात असून, ग्राहक मात्र यापासून अजूनही अनभिज्ञ आहेत.

ठळक मुद्देबँकांचा निर्णय राष्ट्रीयीकृत बँकांच्या सेवा शुल्कात होतेय वाढ

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बचत खात्यात तीन महिन्यांच्या कार्यकाळात किमान एक हजार एवढी रक्कम नसल्यास १८0 रुपये दंड भरावा लागणार आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली असून, बँकांच्या विविध शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नव्याने लागलेल्या या नियमावलीमुळे बँक खात्यांवर अतिरिक्त भुर्दंड टाकल्या जात असून, ग्राहक मात्र यापासून अजूनही अनभिज्ञ आहेत.व्यावसायिकदृष्ट्या काढल्या जाणार्‍या चालू (करंट) खात्यांसाठी दोन वर्षांआधी पुरेशी रक्कम ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे. त्याला मोठय़ा प्रमाणात विरोधही झाला; मात्र चालू खात्याची नियमावली लागू झाली. ठरावीक रक्कम चालू खात्यात नसल्याचे जाणवताच बँक अधिकार्‍यांकडून दंड ठोठाविल्या जात आहे. चालू खात्याला जास्त विरोध उफाळून आल्याने आता राष्ट्रीयीकृत सर्वच बँकांनी एकत्रित येऊन बचत खात्यावरही हे निर्बंध टाकले आहेत. एक बँक खाते चालविण्यासाठी बँकेला लागणारा खर्च आणि त्यांच्या नोंदीची आकडेवारी काढली गेली. दरम्यान, शून्य बॅलेन्सवर सुरू झालेले बँक खाते आणि जनधन बँक खाते यावरचा बँकेचा खर्च वाढला आहे. या खात्यांचा सांभाळ करण्यात बँकांना तोटा सहन करावा लागत आहे. शासनाच्या योजनांचे खाते यामध्ये जास्त आहे. त्यात कर्ज बुडवी खाते वेगळे आहेत. या सर्व बाबींचा विचार करून बँकांना भविष्यात जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे; मात्र याबाबत ग्राहकांना अजूनही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. केवळ बँक परिसरात फलक लावून सेवाशुल्कात वाढ झाल्याचे कळविले गेले आहे. जेव्हा ग्राहकाच्या बँक खात्यातून रकमा कमी होतील, तेव्हा त्यांना दंड पडल्याची जाणीव होणार आहे. देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या या नवीन धोरणामुळे बँक खात्यांवर किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकापाठोपाठ एक आता सर्वच राष्ट्रीयीकृत बँका आपापल्या नियमावलीनुसार सेवा कर आकारणार आहे. काही वर्षांआधी स्टेट बँकेने सेवा कर लावला. ऑगस्टपासून सेंट्रल बँकेने सेवा कर सुरू केला आहे. शून्य रकमेवर बँक खाते उघडले जाईल; मात्र त्यात पुरेशी रक्कम ठेवावी लागेल.- तुकाराम गायकवाड, जिल्हा लीड बँक मॅनेजर, अकोला.