शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोळ््याच्या दिवशी कावड-पालखी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:04 IST

यंदा मात्र शेवटच्या (पाचवा) सोमवारी २१ आॅगस्ट रोजी पोळा सण असून, याच दिवशी कावड-पालखी महोत्सवाचे आयोजन होणार असल्यामुळे शिवभक्त बुचकळ््यात पडले आहेत. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्यामुळे शिवभक्तांची तारांबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देशिवभक्त बुचकळ््यात

आशिष गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. राज्यातील एकमेव कावड-पालखी महोत्सवात हजारो शिवभक्त सहभागी होतात. यंदा मात्र शेवटच्या (पाचवा) सोमवारी २१ आॅगस्ट रोजी पोळा सण असून, याच दिवशी कावड-पालखी महोत्सवाचे आयोजन होणार असल्यामुळे शिवभक्त बुचकळ््यात पडले आहेत. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्यामुळे शिवभक्तांची तारांबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहरापासून १८ किमी अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र पाणी कावडद्वारे आणून आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची परंपरा मागील ७१ वर्षांपासून सुरू आहे. कावडसह शहराच्या कानाकोपºयातून असंख्य पालख्या गांधीग्रामकडे रवाना होतात. गांधीग्राम येथून खांद्यावर जलाचे कलश घेऊन शिवभक्त सोमवारी पहाटेपासूनच अकोल्यात दाखल होतात. शहरातील कावड-पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविकांची गर्दी होते. श्रावण महिन्याची चाहून लागताच तयारीसाठी शिवभक्तांची दोन महिन्यांपासूनच लगबग सुरू होते. शेवटच्या सोमवारी विविध देखावे, देवी-देवतांच्या प्रतीकात्मक मूर्ती, सामाजिक बंधुभाव जपणारे संदेश भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. अनेकदा श्रावण महिन्यात चार सोमवार येतात. त्यामुळे चौथ्या सोमवारी कावड-पालखी सोहळा गृहीत धरून शिवभक्त कामाला लागतात. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार असून, शेवटच्या सोमवारी (२१ आॅगस्ट) पोळा सण आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या सोमवारी कावड महोत्सव आहे, असा सवाल शिवभक्तांमध्ये उपस्थित झाला होता. श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी पाचव्या सोमवारी कावड-पालखी महोत्सव पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.