शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णाचे पाणी थांबले अध्र्यावरच!

By admin | Updated: May 2, 2016 02:18 IST

दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदीपात्रात विसर्ग; अध्र्यावरच थांबले पाणी.

अकोला : अकोलेकरांची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक असताना, बुधवारी या धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे; परंतु हे पाणी निश्‍चित स्थळी न पोहोचता अध्र्यावरच थांबल्याने खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणारी ६४ गावे आजमितीस तहानलेलीच आहेत. दरम्यान, मागील वर्षी पाऊस नसल्याने नदीपात्र अगोदरच कोरडेठक आहे. यावर्षीचा उन्हाळाही प्रखर असल्याने हे पाणी खांबोरा-उन्नई बंधार्‍यापर्यंत पोहोचणे शक्य नसतानाही काटेपूर्णा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणार्‍या ६४ गावांची तहान भागविण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे; परंतु नदी कोरडी असून, धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवास १८ किलोमीटर लांब आहे. परिणामी बुधवारी सायंकाळी सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळपर्यंत २४ तास उलटूनही नऊ किलोमीटर अंतरापर्यतच पोहाचले होते. शुक्रवारी हे पाणी दोनदपर्यंतच पोहोचले. त्यापुढे मात्र पाणी सरकले नाही. दोनद येथील डोहात जवळपास अर्धा दशलक्ष घनमीटर जलसाठा या पाण्यामुळे संचयित झाला आहे. काटेपूर्णा धरणातील सोडलेले दोन दशलक्ष घनमीटर पाणी खांबोरा-उन्नई धरणापर्यंत पोहाचणे अशक्य असताना, अकोलेकरांना संकटात टाकून या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. काटेपूर्णा धरणात केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक होता. आता या धरणात केवळ ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. दररोज वेगाने होणारे बाष्पीभवन आणि पाण्याचा होणारा अपव्यव बघता, शिल्लक असलेल्या जिवंत जलसाठय़ावर जून महिन्यापर्यंत अकोलेकरांची तहान भागवणे अशक्य आहे.