शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महान धरणाचे पाणलोट क्षेत्र पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:07 IST

महान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे. धरणाचा चौथा व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे.महान धरणाचा एकूण बुडीत क्षेत्र १२४३ हेक्टर असून, यामधून शेकडो हेक्टर बुडीत क्षेत्र आज रोजी उघड्यावर पडलेले दिसत आहे. महान धरणाच्या काठावर असलेले जांभरूण, कोथळी, वरखेड-देवदरी, धानोरा व फेट्रा या गावांतील पाणलोट क्षेत्र पूर्णपणे उघड्यावर पडलेले आहे. तसेच धरणामधील पुनर्वसन झालेले जुने गाव कोपळी, साथळी व वाघा या गावांची जागा उघड्यावर येऊन दीपमाया मंदिरदेखील संपूर्णपणे कोरडेठण्ण झाले आहे.श्रीक्षेत्र महादेव संस्थान वाघाकडील धरणाचे बुडीत क्षेत्र उघड्यावर पडले असून, गंगामातेच्या मंदिरापासून पाणी शेकडो फूट दूर गेल्याने धरणामधील टेकड्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. काटेपूर्णा अभयारण्य असून, वन्यजीव विभागामार्फत धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे उभारण्यात आले आहेत. मालेगाव परिसरातून येणारी काटाकोंडाळा नदीचे पात्र कोरडे असल्याने आज रोजी गुरेढोरे चरताना दिसत आहेत. महान धरणाची अशी परिस्थिती याअगोदर २००५ मध्ये झाली होती. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी तीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी नेहमी धरणाचे पाणी दिसायचे, त्या ठिकाणी आज रोजी हिरवेगार गवत दिसत आहे.मालेगाव परिसरात दमदार मुसळधार पावसाची महान धरणाला आज रोजी अत्यंत आवश्यकता आहे. मालेगाव पाणलोट क्षेत्र ते महान धरण यादरम्यान असलेले १० लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटाकोंडाळा नदीने महान धरणात येऊ शकणार नाही. सर्वप्रथम हे १० लघू तलाव १०० टक्के भरणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच या भागातील पाणी काटाकोंडळा नदीपात्रातून वाहून पाणी सरळ महान धरणात येऊन मिसळणार, हे विशेष. सध्या सुरू असलेले पावसाचे पाणी असेच कासव गतीने पडल्यास महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ न होता उपलब्ध असलेला जिवंत जलसाठ्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊन शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.  

अकोला शहरावर पाणीटंंचाईचे संकट कायमच!महान धरणाच्या जलसाठ्याची झपाट्याने घट होत असल्याने अकोला शहरावर त्याचे सावट निर्माण झाले आहे. गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पाणी दिल्या जाते; परंतु यावर्षी पावसाला दोन महिने होत असूनही, धरणाच्या पाणी पातळीत तीळमात्रही वाढ न होऊ शकल्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा मोठ्या संकटात सापडला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण