शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

काटेपूर्णा अभयारण्यात लवकरच ‘जंगल सफारी’

By admin | Updated: April 18, 2017 01:54 IST

युद्धपातळीवर वन पर्यटनासाठी विविध कामांची सुरुवात

अकोला : काटेपूर्णा अभयारण्य आता वन्यजीवांच्या दर्शनाने पर्यटकांच्या डोळ््यांचे पारणे फेडणार आहे. काटेपूर्णा अभयारण्यात २१ एप्रिलपासून जंगल सफारी सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत काटेपूर्णा अभयारण्यात फक्त नेचर ट्रेलच्या माध्यमातून फिरता यायचे; पण नव्याने रुजू झालेले मुख्य वनसंरक्षक व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांनी काटेपूर्णा अभयारण्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून, युद्धपातळीवर वन पर्यटनासाठी विविध कामांची सुरुवात करण्यात आली.याबाबत अधिक माहिती देताना रेड्डी यांनी सांगितले की, काटेपूर्णा अभयारण्यात इको टुरिझमसाठी खूप मोठा वाव आहे. काटेपूर्णा धरणामुळे येथे वर्षभर इको टुरिझम सुरू राहू शकतो. यामधून या अभयारण्यालगतच्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये पहिल्या टप्प्यात अभयारण्यात जंगल सफारीसाठी रस्त्यांची व पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जवळपास २० किमी अंतराचे नवीन सफारीसाठी रस्ते तयार करण्यात आले आहे. आजपर्यंत काटेपूर्णा अभयारण्यात राहण्याची व्यवस्था नव्हती. तिथे आता राहण्यासाठी कॉटेजसची निर्मिती करण्यात आली आहे. काटेपूर्णा अभयारण्यात आढळणारे बिबट, अस्वल, मसन्या उद, खवल्या मांजर, चितळ, चौसिंगा, चिंकारा, रान मांजर, तडस, कोल्हा, रानडुक्कर, रानकुत्रे आदी वन्यप्राणी यांच्यासोबतच जवळपास १५० प्रकारचे पक्षी अशी समृद्ध जैवविविधता जगासमोर येणे गरजेचे आहे. काटेपूर्णा अभयारण्यातील वनपर्यटनाला उत्तम सेवा व सुविधा देण्यासाठी वाघा, फेट्रा, धोतरखेडा, रुई, देवदरी या गावातील ग्राम परिसर विकास समितीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. शेगाव, वाशिम, अमरावती अशा ठिकाणी माहितीचे बोर्ड लावून काटेपूर्णा अभयारण्याची माहिती जनमानसात देण्यात येणार आहे. तसेच गावातील महिलांचे बचत गट तयार करू न त्यांना टी-शर्ट मेकिंग, बांबूपासून विविध वस्तू बनविणे, हॉटेल व्यवस्थापन आदी प्रशिक्षण देऊन त्यांना वनपर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात कासमार गेटवरू न सफारी सुरू करण्यात येणार आहे. ही सफारी कासमार, चाका लपणगृह, रिव्हर व्ह्यु, चिचबन फेट्रा, पांडव लेणी पॉइंट, रिव्हर पॉइंट, चौफुला करू न परत कासमार गेट अशी राहणार आहे. यामधील पाणवठ्यावर वन्य जीवांचे दर्शन सहजरीत्या होऊ शकते. काटेपूर्णातील वन पर्यटन वाढविण्यासाठी उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, वनरक्षक आर.आर.घुटके, जी.वाय.बेर्डे, व्ही.जी.राऊत, ग्राम परिसर विकास समिती अध्यक्ष मंगेश इंगळे, मंगलदास येवले, अवि देशमुख प्रयत्नशील आहेत.