शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कापशी तलाव; तांत्रिक सल्लागारच्या निविदा उघडल्या

By admin | Updated: February 27, 2016 01:41 IST

तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त; प्रशासन देणार वर्कऑर्डर

अकोला: महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुषंगाने मनपा जलप्रदाय विभागाने प्रकाशित केलेली निविदा उघडण्यात आली असून, तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या आठवडाभरात पात्र कंपनीला वर्कऑर्डर दिल्या जाईल.शहरापासून नजीक कापशी तलावाच्या देखरेखीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी शहराला पाणीपुरवठा करणारी बीडची पाइपलाइन काढून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया ठप्प पडली. या तलावात होणार्‍या मासेमारीपासून मनपाला अत्यल्प आर्थिक उत्पन्न प्राप्त होते. तलावातील जलसाठय़ाचा पिण्यासाठी वापर होत नसून, प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. अशावेळी शहरातील पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मनपाने समोर केला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तातडीने पावणे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून तलावाला आवारभिंत उभारण्यासह विविध कामे केली जातील. सौंदर्यीकरणासाठी मनपाने तांत्रिक सल्लागारची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया राबवली. यादरम्यान, मनपाला तीन निविदा अर्ज प्राप्त झाले. प्रशासनाने निविदा उघडल्या असून, कमी दराने सादर केलेल्या कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाईल.