शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

महाराष्ट्रात कबड्डी अकादमी सुरू  कराव्या - विजय जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:51 IST

अकोला : महाराष्ट्रात कबड्डीसाठी पोषक वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याकरिता प्रत्येक जिल्हय़ात एक कबड्डी अकादमी शासनाने सुरू  करावी. यासाठी महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे तसेच नामवंत ज्येष्ठ कबड्डीपटूंचे सहकार्य घ्यावे, असे मत कबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत करताना व्यक्त केले.

ठळक मुद्देकबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांचे मत

नीलिमा शिंगणे-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्रात कबड्डीसाठी पोषक वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याकरिता प्रत्येक जिल्हय़ात एक कबड्डी अकादमी शासनाने सुरू  करावी. यासाठी महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे तसेच नामवंत ज्येष्ठ कबड्डीपटूंचे सहकार्य घ्यावे, असे मत कबड्डीचे महागुरू  विजय जाधव यांनी ‘लोकमत’शी विशेष बातचीत करताना व्यक्त केले.खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेनिमित्त शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विजय जाधव केळीवेळी (अकोला) येथे आले आहेत. हरयाणाच्या खेळाडूंचे सध्या कबड्डीवर वर्चस्व आहे. उत्तम शारीरिक क्षमता आणि कठोर मेहनत घेण्याची खेळाडूंची तयारी असते. त्याहीपेक्षा शासनाने साई प्रशिक्षण केंद्र आणि कबड्डी अकादमी स्थापन केल्या आहेत. तेथील प्रशिक्षण, क्रीडा सुविधांचा लाभ निश्‍चितच खेळाडूंना होतो, असेही जाधव म्हणाले.विदर्भ ही कबड्डीची पंढरी आहे. विदर्भाच्या खाणीमध्ये नीळकंठ खानझोडे, प्यारेलाल पवार, देवी सरभरे, अनिल भुते, रामभाऊ पोवार, प्रकाश बोलाखे, वासुदेव नेरकर, गुलाबराव गावंडे, नंदू पाटील, वासुदेव गरवाले, शरद नेवारे, शेखर पाटील, आमिर खान पठाण, मुश्ताक खान, काशीनाथ रिठे असे अनेक हिरे कबड्डीत जन्माला आलेले आहेत. विदर्भात पूर्वी भारतातील ८0 टक्के ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा विदर्भातच व्हायच्या. यवतमाळ, नागपूर, दिग्रस, मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, पांढरकवडा, वर्धा, कारंजा, अकोला येथे सातत्याने स्पर्धांचे यशस्वी आयोजन व्हायचे. आता विदर्भात कबड्डी सामने फारसे होत नाहीत. आयोजन खर्चाचे बजेट हे त्यामागचे कारण आहे, अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.१९५४ ते १९७४ पर्यंत महाराष्ट्राचे कर्णधारपद मुंबईकडे होते. तब्बल २0 वर्षानंतर कोल्हापूरकडे हे कर्णधारपद आणणारे विजय जाधव पहिले खेळाडू ठरले. महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. एलआयसीमधून सेवानवृत्त झाल्यानंतर कोल्हापूरला महालक्ष्मी क्लब आणि श्री शिवाजी उदय मंडळ चालू केले. खेळाडूंना पूर्णवेळ प्रशिक्षण देणे सुरू  केले. अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेत. यामधूनच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त उमा भोसले, मुक्ता चौगुले आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त तथा थायलंड महिला विश्‍वचषक विजेता संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडेगिरी (सध्या दिल्ली दबंग प्रशिक्षक) सारखे कबड्डीचे महारथी घडले. तसेच या संस्थांमधून कबड्डी सोबतच सायकलिंग व कॅरमचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरKabaddiकबड्डी