शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वेतनेतर अनुदानाची माहिती सादर करण्यास कनिष्ठ महाविद्यालये उदासीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:40 IST

अद्याप कनिष्ठ महाविद्यालयांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहितीच सादर केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

अकोला: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाकडून वेतनेतर अनुदान मंजूर करण्यात येते; परंतु अनुदानावर असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांना (कनिष्ठ महाविद्यालये) वेतनेतर अनुदानाची माहिती सादर करण्यास बजावले होते; परंतु अद्याप कनिष्ठ महाविद्यालयांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहितीच सादर केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.२00८-0९ पूर्वी व नंतर १00 टक्के अनुदानावर असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची वेतनेतर अनुदानासाठी आवश्यक असणारी माहिती विहित प्रपत्रात माध्यमिक शिक्षण विभागाने मागितली होती. या माहितीच्या आधारे शासनाकडे माहिती सादर करून शिक्षण विभागामार्फत कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदानाचे वितरण करण्यात येते. त्यासाठी ही माहिती सादर करणे आवश्यक असते; परंतु कनिष्ठ महाविद्यालये ही माहिती सादर करण्यास उदासीन आहेत. आतापर्यंत शिवाजी महाविद्यालय, रालतो विज्ञान महाविद्यालय, आरडीजी कनिष्ठ महाविद्यालय, सुधाकर नाईक व उमाशंकर खेतान कनिष्ठ महाविद्यालय, ना. के. गोखले महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल महाविद्यालय, जागृती महाविद्यालय, टिळक राष्ट्रीय सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, ज्योती जानोरकर महाविद्यालय, डॉ. सुशीलाबाई देशमुख महाविद्यालय, पुंडलिकराव काळे महाविद्यालय, जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालय, इनायते साहेब बी कॉलेज, बोरगाव, शिवाजी महाविद्यालय अकोट, शिवाजी महाविद्यालय अकोट, उर्दू कनिष्ठ महाविद्यालय अकोट, भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालय अकोट, राधाबाई गणगणे महाविद्यालय मुंडगाव, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय निंबा, सरस्वती महाविद्यालय पारस, शिवशंकर कनिष्ठ महाविद्यालय, गुलामनबी आझाद महाविद्यालय, धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय, घोटा व राहित, भैयाजी महाराज महाविद्यालय धाकली, जय बजरंग महाविद्यालय रुस्तमाबाद, डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, दिनकरराव महाविद्यालय सस्ती, बाबूजी तायडे महाविद्यालय, सुधाकरराव नाईक महाविद्यालय, भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर, सुनील राठोड दहातोंडा, अनंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, हातगाव, विद्याभारती महाविद्यालय शेलू बाजार, गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव, सहदेवराव भोपळे महाविद्यालय, हिवरखेड आदी ४२ महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही. ही माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाcollegeमहाविद्यालय