शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

हवाला कांडाच्या चौकशीसाठी न्यायायालची हिरवी झेंडी

By admin | Updated: June 12, 2014 19:06 IST

श्री बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून घेतली होती रक्कम

अकोला : टिळक रोडवरील हॉटेल क्रिष्णा पॅलेसमधून मंगळवारी रात्री हवाला कांडाच्या सुमारे १५ लाख रुपयांच्या रकमेसह एका युवकास ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी न्यायालयात अर्ज सदर रक्कम ही मालकाच्या सांगण्यावरून आपण श्री बालाजी इन्व्हेंस्टमेंट येथून घेतल्याची कबुली युवकाने न्यायालयात दिली असून, न्यायालयाने युवकास जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील लखिसराय जिल्ह्यातील भंडार मननपूर येथील रहिवासी सुनीलकुमार श्रीरामभरोस महतो हा युवक २४ मेपासून टिळक रोडवरील जनता बँकेसमोरील हॉटेल क्रिष्णा पॅलेस येथे राहत होता. या युवकाजवळ हवाला रॅकेटची रक्कम असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व रामदास पेठ पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी या युवकावर गत चार ते पाच दिवसांपासून पाळत ठेवून मंगळवारी रात्री हॉटेल क्रिष्णा पॅलेस येथे छापा मारला. या छाप्यात सुनीलकुमार महतो याच्याकडील १४ लाख ५१ हजार ४८० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी महतो याला रकमेच्या व्यवहाराचे दस्तावेज मागितले असता त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल व इतर साहित्य जप्त केले होते. बुधवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने महतो याला जामीन मंजूर केला; मात्र दर सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावणे तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

** बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून घेतली रक्कमसुनीलकुमार महतो याच्याकडे आढळलेली सुमारे १५ लाख रुपयांची रक्कम ही अलंकार मार्केटमधील श्री बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महतो याच्या पश्चिम बंगालमधील मालकाने सांगितल्यानुसार त्याने श्री बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून ही रक्कम घेतली होती.