बुलडाणा : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना भाजप-सेना यांच्यासह घटक पक्षांची महायुती दुभंगली व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतही काडीमोड झाला. आता हे पक्ष एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढत आहेत; मात्र या चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असे ह्यदुभंगणेह्ण जिव्हारी लागले आहे. लोकमतने आज खामगाव व बुलडाणा शहरात सर्वेक्षण केले असता युती किंवा आघाडी तुटायला पाहिजे होती काय? या प्रश्नावर ह्यनाहीह्ण असे उत्तर बहुमताने मिळाले आहे. यावरुन हा महाघटस्फोट कार्यकर्त्यांना आवडलेला नसल्याचे स्पष्ट होते. युती तुटायला नको होती, असे ८१ टक्के मतदारांना वाटते तर १९ टक्के मतदारांना युती तुटायलाच पाहिजे होती, असे मत होते. आघाडीच्या संदर्भातही आघाडी तुटायला हवी होती, असे म्हणणारे मतदार २७ टक्के तर नको होती, असे म्हणणारे मतदारांची संख्या ७३ टक्के आहे. युती आणि आघाडी दुभंगने अटळ होते; मात्र तरीही चर्चेचे गुर्हाळ सुरु ठेवले, असे युतीच्या संदर्भात ७0 टक्के नागरिकांना तर आघाडीच्या संदर्भात ६४ टक्के नागरिकांना वाटत आहे. तर याच प्रश्नाच्या संदर्भात २९ टक्के लोकांनी प्रतिक्रिया नोंदविण्यास नकार दिला आहे. स्वबळावर लढल्यामुळे कार्यकर्त्यांत राजकीय वैर वाढेल, असे ६६.६६ टक्के मतदारांना वाटते तर २२.६१ टक्के नाही म्हणतात, १४.२८ टक्के मतदारांना असे वैर वाढण्याची शक्यता वाटत आहे.
युती-आघाडी तुटणे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी
By admin | Updated: September 30, 2014 00:17 IST