शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रथमच होणार पाच रोगांचे संयुक्त सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 18:23 IST

१३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत एकूण पाच रोगांबाबत घरोघरी रोग प्रतिबंध जागरुकता निर्माण केली जाणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: राज्यात प्रथमच कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य रोगाबाबात संयुक्त सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत एकूण पाच रोगांबाबत घरोघरी रोग प्रतिबंध जागरुकता निर्माण केली जाणार आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागाच्या हालचाली सध्या सुरू आहेत. राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये २०२५ पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणाºया अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एकचतुर्थांश इतकी घट करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा आरोग्य विभागाकडूनही वारंवार उपाययोजना व विविध प्रकारच्या मोहीम हाती घेण्यात येत आहेत. मात्र राज्यात आता पहिल्यांदाच कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांसोबत कुष्ठरोग, क्षयरोग याबाबतही सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. १३ ते २८ सप्टेंबर २०१९ या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरूग्ण शोध अभियान, सक्रिय क्षरूग्ण शोध मोहीम व उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग या असंसर्गजन्य जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा पातळीवर सर्व संबंधित आरोग्य यंत्रणांकडून मोहिमेची पुर्वतयारी करून घेण्यात येत आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील मोहिमेच्या पूर्वतयारीचे हे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. विविध रोगांची व संयुक्तरित्या राबविण्यात येणारी ही मोहीम घरोघरी पोहचविण्याच्या सुचना आरोग्य विभागाच्या असल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाºयांपासून कर्मचारी चांगलेच कामाला लागलेले आहेत.  असे होणार असंसर्गजन्य आजाराच्या धोक्याचे मुल्यांकनएकूण पाच प्रश्नांद्वारे असंसर्गजन्य आजारांच्या धोक्याचे मुल्यांकन करण्यात येणार आहे. त्यामध्ये आपले वय किती?, आपण दररोज दारू पिता का?, आपण एका आठवड्यात किमान १५० मिनिटे शारीरिक व्यायाम करता काय?, आपण बिडी, सिगरेट, तंबाखूयुक्त गुटखा आदीचे सेवन करता का?, कमरेचे माप, आपल्या परिवारातील कोणी सदस्य उच्च रक्तदाब मधुमेह आणि ह्रदयरोग आजारांनी पीडित आहे का? या प्रश्नावलीचा समावेश आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला चारपेक्षा जास्त गूण असतील तर त्या व्यक्तीला असंसार्गिक आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांना नजीकच्या उपकेंद्रात तात्काळ जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला जाणार आहे.  आतापर्यंत प्रत्येक रोगाची मोहीम वेगवेगळी राबविल्या जात होती. परंतू आता प्रथमच कुष्ठरूग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्य जागरूकता एकत्रित रित्या केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ही मोहीम संयुक्त असल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी कमी लागतील व त्यांचा वेळही वाचणार आहे. -डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य