शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अतिरिक्त शिक्षकांना रुजू करा; शाळांना आदेश!

By admin | Updated: November 7, 2016 02:49 IST

शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून करण्याचेही आदेश नाहीत.

अकोला, दि. ६- जिल्हय़ात अतिरिक्त ठरलेले ५९ शिक्षकांपैकी २0 ते २५ शिक्षकच शाळांवर रुजू झाले. उर्वरित शिक्षकांना मात्र खासगी शाळा रुजू करून घेण्यास नकार देत असल्याने, शिक्षकांची पंचाईत झाली आहे. नोकरी करावी तर कुठे करावी, पगार कोठून निघणार, आदी प्रश्न अतिरिक्त शिक्षकांना भेडसावू लागले आहेत. त्यासाठी शिक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत; परंतु अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्याबाबतचे आदेश खासगी शाळांना देण्यात शिक्षण विभाग उदासीन दिसून येत आहे. एवढेच नाही, तर अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत; परंतु अकोल्यात मात्र तसे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याने, शिक्षक विवंचनेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील खासगी शाळांमधील रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली. त्यानुसार जिल्हय़ात १0७ रिक्त जागा असल्याची माहिती समोर आली आणि खासगी शाळांमध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरल्याची माहिती आली. यामध्ये अनेक शाळांनी जाणीवपूर्वक अतिरिक्त ठरविल्याची ओरडही शिक्षकांनी केली; परंतु अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार झाल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या प्रसंतीक्रमानुसार शाळा निवडण्यास सांगण्यात आले. शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शाळांची निवड केली. अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळांनी कार्यमुक्त केल्यानंतर शिक्षण विभागाने शिक्षकांना रिक्त पदे असलेल्या खासगी शाळांवर रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हय़ात आतापर्यंत २0 ते २५ शिक्षक शाळांमध्ये रुजू झाले. उर्वरित अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजू होण्यास गेले असता, त्या शाळांनी त्यांना रुजू करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक विचारात पडले. आता काम कुठे करावे, कोणत्या शाळेवर रुजू व्हावे, असे प्रश्न शिक्षकांना पडले. रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना सामावून घ्यावे, यासाठी शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने जाऊन विनवण्या करीत आहेत; परंतु रिक्त पदे असलेल्या शाळांना आदेश देण्यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालय उदासीन दिसून येत आहे.शाळा रुजू करून घेण्यास नकार देत असल्याने, आमचा पगार कोठून निघेल, अशी समस्या निर्माण झाली. त्यावर यवतमाळ, बुलडाणा व अमरावती येथील शाळांमध्ये रुजू न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून करण्याचे आदेश तेथील उपसंचालकांनी दिले आहेत; मात्र शिक्षणाधिकार्‍यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्यामुळे अतिरिक्त शिक्षक संभ्रमात आहेत.