शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिसेविकेच्या लॉकरमधून दागिने जप्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:51 IST

सार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसीबीने अधिसेविका मीना मनोहर माहुरे, तिचा पती मनोहर रामभाऊ माहुरे व मुलगा स्वप्निल मनोहर माहुरे या तिघांच्या बँक लॉकरची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दागिने आढळल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देस्थावर मालमत्तेची माहिती घेणे सुरूचरकमेत मोठी वाढ होणार! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसीबीने अधिसेविका मीना मनोहर माहुरे, तिचा पती मनोहर रामभाऊ माहुरे व मुलगा स्वप्निल मनोहर माहुरे या तिघांच्या बँक लॉकरची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दागिने आढळल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये वर्ग ३ कर्मचारी असलेली अधिसेविका मीना मनोहर माहुरे हिने तिच्या सेवाकाळातील १ जानेवारी २00२ ते ३0 जून २0१३ या ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ७0 लाख 0५ हजार ७१८ रुपयांची अपसंपदा गोळा केली. (ही अपसंपदा मिळकतीपेक्षा ४२0.७७ टक्के एवढी अधिक आहे.) या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी सखोल चौकशी करून गीतानगर येथील रहिवासी सेवानवृत्त अधिसेविका मीना मनोहर माहुरे (वय ६१), तिचा पती मनोहर रामभाऊ माहुरे (वय ६५) व मुलगा  स्वप्निल मनोहर माहुरे (वय २८) या तिघांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बुधवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर एसीबीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी बँक खाते, लॉकर सील करून त्याची तपासणी सुरू केली असता बँक लॉकरमध्ये दागिने आढळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर ही तपासणी सुरूच राहणार असून, मीना माहुरे, पती व मुलगा या तिघांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची अधिकाधिक माहिती घेण्यात येत आहे.