शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जावयाने नमस्कार केला नाही, म्हणून थेट पोलिसांत तक्रार!

By admin | Updated: February 10, 2016 02:19 IST

सास-याने दिली तक्रार, चौकशीनंतर तक्रार खोटी असल्याचे आले समोर.

अकोला: जावयाच्या घरी गेल्यानंतर जावाईबापू नमस्कार करीत नाहीत; आदरातिथ्य करीत नसल्याच्या कारणावरून सासरेबुवांनी थेट खदान पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सासर्‍याने खोटी तक्रार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्याचे झाले असे की, खदान परिसरात राहणार्‍या एका इसमाची मुलगी परभणी येथे दिलेली आहे. दीड वर्षांंपूर्वीच परभणी येथील युवकासोबत मुलीचे रीतीरिवाजानुसार लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सासरेबुवा परभणीला जावयाकडे जायचे; परंतु जावई फारसा काही बोलत नव्हता. सासरेबुवांना जावयाने आपल्याला विचारावे, आदर-सत्कार करावा, असे मनोमन वाटायचे. तथापि, जावई कामामध्ये मग्न असल्याने त्याला मानपान देणे शक्य व्हायचे नाही. यामुळे सासरेबुवांचा गैरसमज झाला. जावई आपल्यासोबत बोलत नाही, आपल्याला विचारत नाही, एवढेच काय साधा नमस्कारसुद्धा करीत नाही. त्यामुळे सासरेबुवांनी जावयाची चांगलीच खोडमोड करायचे ठरविले. काही दिवसांसाठी त्यांची मुलगी आपल्या महिन्याच्या चिमुकल्या मुलीसह परभणीहून अकोल्याला माहेरी आली. काही दिवसांनी त्यांना भेटायला जावईबापूदेखील अकोल्यात आले. सासरेबुवांकडे गेले. एक दिवस राहिल्यानंतर ते परभणीला परत जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान सासरेबुवांनी खदान पोलीस ठाणे गाठून जावई आपल्या नऊ महिन्याच्या नातीला बळजबरीने परभणीला घेऊन गेल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनीही गंभीर प्रकार असल्याने तक्रारीची नोंद घेतली आणि तातडीने कामाला लागले. जावई व नातीचा शोध पोलीस बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसरात घेऊ लागले. दरम्यान, जावईबापू आणि मुलगी सासरवाडीतच असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी सर्वांंना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी केली.