शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जावेद इनामदारच्या राज्यातील संपत्तीचा शोध

By admin | Updated: October 24, 2015 01:42 IST

तहसील व नोंदणी कार्यालयांना दिले पत्र, मोठे घबाड येणार उघडकीस.

सचिन राऊत / अकोला: अकोला जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार याची राज्यात अनेक ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (एसीबी) प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे अकोला एसीबीने राज्यातील तहसील कार्यालय व दुय्यम उपनिबंधक कार्यालयांना पत्र पाठवून इनामदारच्या संपत्तीची माहिती मागविली आहे. तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या दोन कर्मचार्‍यांच्या गृह कर्जाच्या प्रकरणाला अंतिम मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शमशोद्दीन इनामदार याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. यामधील १५ हजार रुपयांची लाच त्याने आधीच स्वीकारली, तर उर्वरित १0 हजार रुपयांची लाच घेत असताना त्याला अकोला एसीबीने १९ ऑक्टोबर रोजी रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याच्या घराची झडती घेऊन १ कोटी १६ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली. अकोला एसीबीनेही त्याच्या अकोल्यातील निवासस्थानावरून काही आक्षेपार्ह दस्तऐवज व जिल्हा परिषदेतील कक्षातून ४९ हजार ६६९ हजार रुपये जप्त केले. त्यानंतर इनामदारने त्याच्या संपत्तीची माहिती देण्यासाठी अकोला एसीबीने नियमानुसार माहिती मागितली. मात्र, इनामदार काहीही माहिती देत नसल्याने अकोला एसीबीने संपत्तीची नोंदणी होत असलेल्या राज्यातील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालयांना पत्र पाठवून जावेद शमशोद्दीन इनामदार याच्या संपत्तीची माहिती मागविली आहे. इनामदारच्या मोठय़ा संपत्तीचा यामध्ये पर्दाफाश होणार असल्याचा विश्‍वास अकोला एसीबीला असून, त्यासाठी त्यांनी प्रत्येक तांत्रिक बाबीवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू केला आहे. तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालयांकडून माहिती मिळताच ही संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.