शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जनुना पुनर्वसन शेतशिवारात दूषित पाण्याने आठ शेळ्य़ा  ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:36 IST

सायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. 

ठळक मुद्देमुदतबाह्य औषधसाठा टाकला साचलेल्या पाण्यात! शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशुपालकाच्या बकर्‍या 

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने  कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या  एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील  पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार  झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची घटना १५  ऑगस्ट रोजी घडली. गावातील इतरही गुरांना आजाराने  ग्रासले आहे. जनुना पुनर्वसन येथे पावसाळ्य़ाचे पाणी साचलेल्या  ठिकाणी अज्ञात इसमाने मुदतबाह्य औषध साठा टाकला.  ही औषध पाण्यात मिसळल्याने पाणी दुषित झाले.हे पाणी  तेथे चरण्यासाठी गेलेल्या शेळ्य़ांनी प्राशन केले. त्यामुळे,  त्यातील आठ शेळ्य़ांचा मृत्यू झाला तर २५ बकर्‍यांचा गर्भ पात झाला. तसेच अन्य गुरे आजारी पडले. यामध्ये प्रकाश  तुकाराम इंगळे या शेळीपालन व्यवसाय करणार्‍या पशु पालकाच्या सर्वाधिक बकर्‍या आहेत. या घटनेची माहिती  पशुसंवर्धन विभागाचे डॉ. बी. टी. अस्वार यांना देण्यात  आली. धाबा पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. रंजवे, रामराव  राठोड यांनी तातडीने जनुना येथे जाऊन आजारी बकर्‍यांवर  उपचार केले. सरकारी औषधसाठा कमी असल्यामुळे  बकर्‍यांना औषधे मिळू शकली नाहीत. पशुसंवर्धन  विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देऊन  आजारी व विषबाधेने गंभीर असलेल्या शेळ्य़ांवर उपचार  करावा, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे. 

१५ गुरांचा मृत्यूविझोरा : येथे अज्ञात आजाराने गत दहा दिवसांत  पंधराच्यावर जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांत भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन विभागाने याची  वेळीच दखल घेऊन, या रोगाचे निदान लावून उपचार  करण्याची मागणी पशुपालकांमध्ये होत आहे.विशेषत: गाय व वासरांना या अज्ञात आजाराने ग्रासले  आहे. एकाकी एका पायावर सुज येऊन त्यामध्ये तत्काळ  जनावरांचा अचानक मृत्यू होतो. आतापर्यंत गाय व त्यांच्या  वासरांचा मृत्यू झाला आहे. या अज्ञात आजाराने पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रोजच  दोन ते तीन जनावरे दगावण्याच्या घटना घडत आहेत.