शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘जन-जल-जंगल-जमीन’ संसाधनांचा होणार शाश्‍वत विकास!

By admin | Updated: August 10, 2015 01:02 IST

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजना; मेळघाटातील ३0 गावांचा समावेश.

अतुल जयस्वाल/अकोला: राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र, अतिसंरक्षित क्षेत्र व अभयारण्यालगतच्या गावांतील लोकांचे जंगलांवरचे अवलंबित्व कमी करतानाच या गावांचा सर्वांगीण विकास करून, मानव-वन्य प्राणी सहजीवन प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने शासनाने या गावांसाठी २0१५-१६ ते २0१९-२0 या चार वर्षांकरिता 'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजना' सुरू करण्याचा निर्णय ४ ऑगस्ट रोजी घेतला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम परिस्थितीकी विकास समिती, प्रकल्पस्तरीय व राज्यस्तरीय अशा समित्या गठित करण्यात येणार आहेत. राज्यातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्पाचे अतिसंरक्षित क्षेत्रामध्ये अद्यापही अनेक गावे आहेत. या गावांमधील लोक सरपण व घरगुती वापरासाठी लागणारे लाकूड, जनावरांचा चारा, रोजगार आदी गरजांसाठी जंगलांवर अवलंबून आहेत. त्यामुळे जंगलांचा दर्जा खालावत आहे. तसेच सदर गावे जंगलव्याप्त असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता अधिक आहे. अशा गावांमधील ह्यजन-जल-जंगल-जमीनह्ण या संसाधनांचा शाश्‍वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, गावकर्‍यांची जंगलांवरील निर्भरता कमी करून, त्यांना पुरक जोडधंदे व रोजगार उपलब्ध करून देणे या माध्यमातून मानव-वन्य प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी या गावांमध्ये ह्यडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजनाह्ण प्रकल्प स्वरूपात राबविण्याचा निर्णय महसूल व वनविभागाने घेतला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व अभयारण्यालगतच्या गावांचा विकास आणि गावकर्‍यांच्या सहभागातून वन व वन्य जीवांचे संरक्षण-संवर्धन, असा दुहेरी उद्देश या योजनेच्या माध्यमातून साध्य होणार आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनेतील तरतुदींची सांगड घालून एकात्मिक व नियोजनबद्धरीत्या या गावांचा शाश्‍वत विकास साधल्या जाणार आहे. अमरावती व अकोला जिल्हय़ात पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व अतिसंरक्षित क्षेत्रांमधील ३0 गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांसाठी ही योजना लागू झाली असून, अभयारण्यालगतच्या गावांसाठी पुढील वर्षी ती लागू होणार आहे.