शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
3
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
4
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
5
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
6
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
7
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
8
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
9
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
10
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
11
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
12
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
13
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
14
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
15
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
16
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
17
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
18
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
19
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
20
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

जामोद दंगल : ८७ जणांना अटक

By admin | Updated: April 18, 2016 02:26 IST

दुस-या दिवशीही संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : जामोद येथील दंगलप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून, ८७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रात्रीपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी रविवारी दुसर्‍या दिवशीही कायम होती. संचारबंदीमुळे गावातील एक लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. श्रीराम नवमीनिमित्त आयोजित महाप्रसादासाठी १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान भाकरी घेऊन ट्रॅक्टर जात होता. ट्रॅक्टर जात असलेल्या मार्गावरील रहिवासी मुक्कदरखा इसाखा यांच्या आईचे निधन झाल्यामुळे तेथे घोषणा देऊ नये, असे सांगण्यात आले. परंतु घोषणा सुरूच राहिल्याने तेथे बाचाबाची होऊन तणाव वाढला. यानंतर दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता. १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, १७ एप्रिल रोजी दिवसभर संचारबंदी कायम होती. १६ एप्रिल रोजी रात्री जमावाकडून चार दुकाने, दोन मोटारसायकली, दोन चारचाकी वाहने, दोन पानठेल्यांची जाळपोळ तसेच तीन ते चार दुकानांची तोडफोड करण्यात आली. तसेच दोन चारचाकी वाहनांची नासधूस केली. तीन वाहनांना जाळण्याचा प्रयत्न झाला. तसेच दोन्ही समाजाच्या प्रार्थनास्थळांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी झालेल्या दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सोळंके, पोकाँ सुभाष वाघमारे, भूषण सोळंके, गजानन नरुटे, कैलास पंडित व दीपक सपकाळ जखमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे व निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. १६ एप्रिल रोजी रात्रीपासूनच पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे १११ आरोपींविरुद्ध गुन्हा र.नं. १५४/२0१६ कलम १४३, १४७, १४८, १४९, ३९५, ३५३, ३0७, ३२४, ३३२, ४३५, ४३६, २९५, १८६ भादंविनुसार तसेच ३/२५, ४/२५, ७ (अ), २७ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ७ क्रिमिनल अमेडमेंट अँक्ट, कलम ३ व ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल करून एकूण ८७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.