शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात १२ गावात 'जलसमृध्दी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 16:50 IST

'Jalsamrudhi' in 12 villages in Murtijapur taluka : मधापूरी, राजनापूर खिनखिनी, माना, जितापूर खेडकर, कंझरा, खापरवाडा, किनी फनी, या गावात मोठी कामे झाली आहेत.

-संजय उमकमूर्तिजापूर :  तालुक्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे हाती घेऊन ती पुर्णत्वास नेण्यात आली आहे. यामुळे जलपातळी वाढली असल्याने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने कृषी विभाग, जिल्हा परिषद, वनविभाग, व पंचायत समिती यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यास मदत झाली.         सन  २०१८-१९ मध्ये तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. यामध्ये धानोरा खुर्द, गणेशपूर, हयातपूर, इसापूर, जितापूर नाकट, मंडूरा, माटोडा, पिशवी, सैदापूर, सिंकंदरपूर, सोनाळा, उमरी या १२ गावात अभियान राबवून येथील ढालीचे बांध, शेततळे सिमेंट नाला बांधकाम, गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला खोलीकरण व सरळीकरण, नाला दुरुस्ती, साखळी सिमेंट क्रॉंक्रीट नाला बांधकाम व रुंदीकरण, खोदतळे, ई क्लास शेततळे, गावतलाव दुरुस्ती. खोल सरळ समतल चर, रिचार्ज शाप्ट, विहिर व बोअरवेल पुनर्भरण आदी कामाचा समावेश असून यासाठी १७ लाख ३१ हजार खर्च करण्यात आला. या व्यतिरिक्त  भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने 'सुजलाम् सुफलाम्'  या अभियानात तालुक्यातील मधापूरी, राजनापूर खिनखिनी, माना, जितापूर खेडकर, कंझरा, खापरवाडा, किनी फनी, या गावात मोठी कामे झाली आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. किनी फणी, राजनापूर खिनखिनी येथे सर्वाधिक काम झाले असून मधापूरी येथे मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली असून येथील तळे 'मॉडेल' ठरले आहे. मूर्तिजापूर तालुक्यात प्रशासकीय मंजुरी मिळालेले ७४ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी कामे पूर्ण करण्यासाठी सदर गावाचा एक सर्वे करून तेथील गुरे, लोकसंख्या लक्षात घेऊन आवश्यकते नुसार जलयुक्त शिवाराची कामे करण्यात येते. जलयुक्त शिवार अभियान अभियानांतर्गत ही कामे राबली जातात २०१८-१९ च्या अभियानात ७४ कामे पुर्णत्वास गेली आहेत यात शेततळे व नाले खोलीकरण महत्त्वाचे ठरले या कामाचा जलपुर्ती निर्मिती अहवाल सादर करण्यात आला. गतवर्षी पासून अभियान शासन स्तरावर बंद आहे.-अमृता काळेतालुका कृषि अधिकारी, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला