शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीतील आरोपी २६ वर्षांनंतर जेरबंद

By admin | Updated: January 15, 2017 20:36 IST

मारहाणी प्रकरणातील आरोपीला न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तब्बल २६ वर्षांनी आज अटक केली.

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 15 -  मारहाणी प्रकरणातील आरोपीला न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तब्बल २६ वर्षांनी रविवारी अटक केली. १९९१ मध्ये मारहाणीची ही घटना घडली होती. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी फरार होता. 
 नया बैदपुरा येथील रहिवासी सलीम खा रहीम खा (५५) हा १९९१ मध्ये झालेल्या एका मारहाणी प्रकरणात आरोपी होता. सदर घटनेनंतर आरोपी सलीम खा पसार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, पोलिसांना तो तब्बल २६ वर्ष दिसला नाही. त्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यात असमर्थ ठरले. आरोपी अटक न झाल्याने पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयात तो हजर होत नसल्याने त्याच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट काढले. तरीही तो न्यायालयासमोर हजर झाला नाही. अखेर न्यायालयाने त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश बजावला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सदर आरोपीचा शोध घेतला. त्यांनी सलीम खा यास अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.